Rashmika Mandana Google
मनोरंजन

नॅशनल क्रश रश्मिका किचनमध्ये रमली;चाहते म्हणाले,'कसं बरं जमतं?'

'Mind my buisness' गाण्यावर रश्मिकानं ठेका धरलेला व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

प्रणाली मोरे

एक्सप्रेशन क्वीन,नॅशनल क्रश असे मोठमोठाले शब्द जिच्या नावाआधी जोडले जातात अशी रश्मिका मंदाना(Rashmika Mandana) सध्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनत चालली आहे. रश्मिकानं दाक्षिणात्य सिनेमातनं काम करायला सुरुवात केली असली तरी आता ती दणक्यात बॉलीवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच तिचा सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा 'मिशन मजनू' हा सिनेमा आपल्या भेटीस येणार आहे. तसंच तिच्या 'पुष्पा- द राइज' या सिनेमानंही लोकांच्या उदंड प्रतिसादाचा लाभ उठवला. अल्लु अर्जूनसोबतच रश्मिकानंही 'पुष्पा' सिनेमात आपला ठसा उमटवलेला दिसला. या सिनेमातील तिच्या 'सामी सामी' गाण्याच्या तालानं आणि त्यावर नाचलेल्या रश्मिकाच्या ठुमक्यानं सगळ्यांनाच घायाळ केलं. सोशल मीडियावर तर नुसता पाऊस पडला होता या गाण्याच्या व्हिडीओ रील्सचा. केवळ सर्वसामान्य चाहत्यांनी नाही तर सेलिब्रिटींनीही 'सामी-सामी' गाण्यावर ठेका धरलेला आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल.

रश्मिका सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. तिच्या व्हिडीओ रील्स तर धमाल असतात. अनेकदा तर तिच्या डान्सच्याच व्हिडीओ रील्स आपल्याला इतका आनंद देऊन जातात की विचारू नका. सध्या बॉलीवूडमध्ये काम करण्याच्या निमित्तानं रश्मिका मुंबईत घर घेऊन राहतेय. अनेकदा मुंबई विमानतळावर,मुंबईतील हॉटेलमध्ये किंवा मग मुंबईतील तिच्या घरातही वावरतानाचे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहतो. त्याचा आनंद घेतो. असाच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यावर चाहत्यांनी तिचं कौतूक करणाऱ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत,ज्या लक्षवेधी ठरत आहेत.

रश्मिकाच्या या व्हिडीओत ती मस्त 'Mind My buisness' एका इंग्रजी गाण्यावर डान्स करतेय. ती तिच्या घरात किचनमध्ये दिसतेय. हातात पाण्याचा ग्लास घेत,पाणी पित संबंध घरभर ती नाचताना दिसतेय. तिच्या या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलंय,''जेव्हा लोकं मला विचारतात तू कायम आनंदी कशी?'' या प्रश्नाला उत्तर देताना हा व्हिडीओ आपण पोस्ट करत आहोत असं तिला म्हणायचं आहे. या चाहत्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना तिनं गाणं देखील अगदी समर्पक निवडलं आहे. 'Mind My Buisness' म्हणत तिला सांगायचे आहे, ''मी माझ्याच कामात लक्ष देेते,लोकांच्या कामात लुडबूड करत नाही,कामाचा आनंद घेते,म्हणून मी कायम आनंदी''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT