rashmika mandana Rashmika Mandana
मनोरंजन

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हिला पाहून चाहते झाले घायाळ

पुष्पा हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे

सकाळ डिजिटल टीम

तेलुगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) ही नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर तिचे खूप चाहते आहेत. सोशल मीडियावर रश्मिकाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती काळ्या साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊजमध्ये खूपच सुंदर (beautiful photo) दिसत आहे. फोटोंमध्ये रश्मिका वेगवेगळे लूक देताना दिसत आहे. ती हसत आहे आणि तिच्या हसण्याने चाहत्यांना भुरळ पडली आहे.

रश्मिका मंदानाचा १७ डिसेंबर रोजी ‘पुष्पा-द राइज पार्ट १’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटात ती अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे. रश्मिकाच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. रश्मिकाला नॅशनल क्रश (National Crush) आणि स्माईल क्वीन असे नाव चाहत्यांनी दिले आहेत. पुष्पा या चित्रपटात रश्मिका श्रीवली नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे.

रश्मिकाची ही छायाचित्रे रविवारी झालेल्या पुष्पा चित्रपटाच्या कार्यक्रमातील असल्याचे सांगण्यात येते. या कार्यक्रमात काही चाहते जखमीही झाले होते. यानंतर रश्मिकाने इंस्टाग्रामवर (social media) खंतही व्यक्त केली होती. रश्मिका लवकरच हिंदी चित्रपटांमध्येही दिसणार आहे. ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्पाय थ्रिलर मिशन मजनूचे शूटिंग करीत आहे. तिचा दुसरा चित्रपट गुडबाय आहे. ज्यामध्ये रश्मिका अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हे दोन्ही चित्रपट २०२२ मध्ये रिलीज होणार आहेत.

बहुप्रतिक्षित चित्रपट

पुष्पा (pushpa movie) हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. तेलुगूसोबतच हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुनचा हा पहिलाच चित्रपट आहे, जो थेट हिंदीतही प्रदर्शित होत आहे. पुष्पा या चित्रपटाची कथा आंध्र प्रदेशातील जंगलात चंदनाच्या तस्करीच्या मुद्द्यावर आधारित आहे. अल्लू अर्जुन चित्रपटात ही तस्करी थांबवताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT