Rashmika Mandana Instagram
मनोरंजन

Rashmika Mandana: रश्मिकाचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ पाहून पब्लिक तापलं..म्हणाले,'ही तर साऊथ मधली..'

रश्मिका मंदाना सध्या बॉलीवूडच्या काही प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्यामुळे अनेकदा तिचे एअरपोर्ट व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.

प्रणाली मोरे

Rashmika Mandana: साऊथ सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानानं 'पुष्पा' सिनेमातील आपल्या अदाकारीनं देशातील कानाकोपऱ्यात आपलं नाव पोहोचवलंय. आज देशात नाही तर जगभरात तिच्या चाहत्यांची मोठी संख्या पहायला मिळते.

बॉलीवूडमध्ये देखील सध्या तिची चर्चा रंगली आहे. तिनं 'गूडबाय' सिनेमातून हिंदी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. एकीकडे ती इतकी प्रसिद्ध होताना दिसतेय तिथे दुसरीकडे तिच्या विरोधात सूर काढला जातोय. (Rashmika Mandana trolled ariport video viral )

लोक तिला 'ओव्हर अॅक्टिंग की दुकान' म्हणताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच रश्मिका मुंबई एअरपोर्टवर दिसली होती आणि तिथं तिनं ज्या काही आपल्या अदा दाखवल्या त्याची जोरदार चर्चा आता रंगली आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या त्या अदांना भले पसंत केलं असेल पण काही लोकांनी मात्र तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

रश्मिका मंदाना पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये मुंबई एअरपोर्टवर दिसली. तिनं पापाराझीसोबत खूप चांगल्या पद्धतीनं संवाद देखील साधला. आणि तिचा हा अंदाज पाहून तिचे चाहते तिचं कौतूक करु लागले.

हेही वाचा: योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

Rashmika Mandana Trolled

पण काही लोकांनी मात्र रश्मिकाच्या या वागण्याला नावं ठेवली आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, 'एवढी ओव्हरअॅक्टिंग कशासाठी,कुणाला दाखवायला? डिसलइक बटण कुठे आहे?' ,तर आणखी एकानं कमेंट करत लिहिलं आहे की,'ओव्हर अॅक्टिंग की दुकान..ही तर साऊथ सिनेमातील बॅन केलेली अभिनेत्री. आता हिंदी इंडस्ट्री बिघडवायला आली आहे.. एक सिनेमा फ्लॉप झाला. पुढचा मिशन मजनू आणि त्यानंतर एनिमल...आहेतच फ्लॉप होण्यासाठी तयार..'

रश्मिका मंदानानं तेलुगु,कन्नड,हिंदी आणि तामिळ सिनेमातून काम केलं आहे. तिनं २०१६ मध्ये 'किरिक पार्टी ' नावाच्या सिनेमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 'गीता गोविंदा','पुष्पाःद राइज', आणि 'सिता रामम' सारख्या सिनेमातून ती दिसली.

तिनं 'गूडबाय' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं ..पण सिनेमा बॉक्सऑफिसवर अक्षरशः झोपला. आता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती 'मिशन मजनू' आणि रणबीर कपूरसोबत 'एनिमल' सिनेमातून ती दिसणार आहे. याव्यतिरिक्त अल्लू अर्जून सोबत पुन्हा एकदा 'पुष्पा २' सिनेमात ती दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women’s World Cup 2025 Ind vs Pak : आज भारत-पाकिस्तान आमनेसामने, महिला खेळाडू हस्तांदोलन करणार?

MPSC 2025: खुल्या प्रवर्गाने परीक्षा द्यायची नाही का? ‘राज्य कर निरीक्षक’ पदासाठी शून्य जागा; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT