Rashmika Mandanna Edited Video esakal
मनोरंजन

Rashmika Viral Video : रश्मिकाचा 'तो' व्हिडिओ, अमिताभ बच्चन यांचा संताप! 'कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी', नेमकं घडलं काय?

सध्या रश्मिका तिच्या एका वेगळ्या व्हिडिओमुळे ट्रोल झाली आहे.

युगंधर ताजणे

Rashmika Mandanna Edited Video : प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना ही गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेली सेलिब्रेटी आहे. ती नॅशनल क्रश म्हणूनही ओळखली जाते. पुष्पानंतर तिच्या वाट्याला अमाप लोकप्रियता आली. त्यानंतर तिनं बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांसोबत स्क्रिन शेयर केली आहे.

रश्मिकानं बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील स्क्रिन शेयर केली आहे. सध्या रश्मिका तिच्या एका वेगळ्या व्हिडिओमुळे ट्रोल झाली आहे. तो व्हिडिओ खरचं तिचा आहे की आणखी कुणाचा आहे हे देखील समोर आले आहे. मात्र या सगळ्यात बिग बी अमिताभ बच्चन यांनी रश्मिकाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं घडलंय काय हे आपण जाणून घेणार आहोत.

रश्मिकाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो एडिटेड असल्याचे दिसून आले आहे. तो बोल्ड व्हिडिओ अनेकांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन तिच्या बाजूनं उभे राहिले आहेत. आणि ज्यानं कुणी तो व्हिडिओ मॉर्फ केला आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली गेली पाहिजे असेही म्हटले आहे. सध्या तो व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

त्या व्हिडिओमध्ये दिसून येते की, रश्मिकानं डीपनेक जिम वेअर परिधान केले आहे. मात्र प्रत्यक्षात ती रश्मिक नसून दुसरी सोशल मीडिया इन्फ्ल्युंसर असल्याचे दिसून आले आहे. तिचे नाव झारा पटेल असे आहे. एका युझर्सनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्च केला असून त्यानं देशाला आता अशा प्रकारच्या डीपफेक व्हिडिओपासून वाचण्यासाठी काही ठोस उपाययोजना करावी लागणार आहे. हा व्हिडिओ मंदानाचा नसून तो झाराचा आहे.

अमिताभ यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यावर तीव्रपणे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारच्या कृतीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. यावर बिग बी यांनी देखील रियल व्हिडिओ शेयर करुन कशाप्रकारे व्हिडिओ मॉर्फ केले जातात हे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT