Rashmika Mandanna and Vijay Deverakonda: Esakal
मनोरंजन

Rashmika- Vijay: लगीनघटिका आली? रश्मीका अन् विजयच्या कुटूंबाची लग्नाची तयारी सुरु! 'तो' व्हिडीओ व्हायरल

Vaishali Patil

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda: साऊथ इंडस्ट्रीची 'श्रीवल्ली' म्हणजे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे मनोरंजन विश्वातील चर्चेतलं कपल आहे. दोघेही एकमेंकाना डेट करत असल्याच्या अफवा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

त्यांनी अनेकदा डेटिंगच्या अफवा फेटाळून लावल्या असल्या तरी ते बऱ्याचवेळा सोबत दिसून आले आहेत. त्यामुळे त्यांचे चाहते या डेटिंगच्या अफवांना खरं ठरवत असतात.

मात्र या वर्षाच्या सुरुवातीला दोघांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. ज्यामुळे त्याचे चाहतेही नाराज झाले होते. पण आता इंटरनेटवर रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या पॅचअपची रंगली आहे.

सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकत्र क्वालिटी टाईम घालवतांना दिसत आहे. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा दोघ डेट करत असल्याच्या अफवा वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना या व्हिडिओत त्याच्या मित्रांसोबत मस्ती करतानाचा दिसत आहे. गौतम तिन्ननुरी, आनंद देवरकोंडा आणि शेर्या वर्मा हे दिग्दर्शकही व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याची कुजबुज तेव्हा सुरू झाली जेव्हा मालदीव व्हॅकेशनचे दोघांचे फोटो समोर आले. दोघांनी सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले होते. पण दोघांचा एकत्रित असा एकही फोटो समोर आला नव्हता. त्यानंतर रश्मिकाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या हातात रिंग दिसली आणि चर्चांना उधाण आलं होते.

त्यामुळे हा व्हिडीओ पाहून आता चाहत्यांनी थेट त्याच्या लग्नाच्याच चर्चा सुरु केल्या आहेत. त्यामुळेच ते कुटुंबाची एकमेकांना भेट घालुन देत असल्याच बोललं जात आहे.

रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'अॅनिमल' या चित्रपटात रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा सिनेमा 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ती सध्या पुष्पा 2 चे शूटिंग करत आहे.

तर विजय देवरकोंडा हा सामंथा रूथ प्रभूसोबत 'खुशी' या नवीन चित्रपटात दिसणार आहे. यासोबतच तो 'जन गण मन' या चित्रपटात जान्हवी कपूरसोबत दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT