Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Sakal
मनोरंजन

Bollywood Affairs:विजय आणि रश्मिका करत आहेत सिक्रेट डेटिंग? हा व्हायरल फोटो पाहून चाहत्यांना आला संशय

नवीन वर्षाच्या निमित्ताने दोन्ही स्टार्सनी त्यांच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोटो पोस्ट केले आहे. आता त्यांच्या या पोस्टमुळे त्यांच्या अफेअरच्या बातम्यांना उधाण आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

विजय देवरकोंडाची तरुणांमध्ये मोठी फॅन फॉलोइंग आहे. तो जे काही पोस्ट करतो, त्याच्यावर चाहत्यांची करडी नजर असते. असेच काहीसे रश्मिका मंदान्नाचेही आहे. आता नवीन वर्षाच्या निमित्ताने दोन्ही स्टार्सनी त्यांच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोटो पोस्ट केले आहे. आता त्यांच्या या पोस्टमुळे त्यांच्या अफेअरच्या बातम्यांना उधाण आले आहे.

नवीन वर्षाच्या दिवशी, विजयने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर स्विमिंगपूलजवळ शॅम्पेनचा आनंद घेतानाचा एक फोटो शेअर केला. विजय देवरकोंडाच्या नवीन वर्षाच्या पोस्टनंतर पंधरा मिनिटांनंतर, रश्मिका मंदान्नाने 'हॅलो 2023' म्हणत सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला.

दोघांच्या फोटोंचा बॅकग्राउंड सारखाच आहे, त्यामुळे पुन्हा एकदा डेटिंगच्या बातम्या येत आहेत. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दोघेही मालदीवमध्ये गेल्याची चर्चा आहे. इन्स्टाग्रामवरील त्यांच्या लेटेस्ट पोस्टमध्ये, अभिनेत्री काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रश्मिका खूपच सुंदर दिसत आहे.

आपला फोटो शेअर करताना विजयने लिहिले की, '‘एक वर्ष जे काही क्षणांसाठी कायम खास राहिल… जेव्हा आपण मोठ्याने हसलो, शांतपणे रडलो, आपल्या स्वप्नाचा पाठलाग केला, काही गोष्टी जिंकलो, काही गोष्टी हरलो, तर काही गमावले.... आपल्याला सर्वकाही साजरे करण्याची गरज आहे कारण तेच जीवन आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा हे वर्ष तुम्हा सर्वांसाठी चांगले जावो,' असे सुंदर कॅप्शन विजयने लिहिले आहे.

आता विजयने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो नवीन वर्षाच्या निमित्ताने आकाशात फटाक्यांची आतषबाजी करताना दिसत आहे. आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, नेटिझन्स असा दावा करत आहेत की हा व्हिडिओ रश्मिकाने नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान कॅप्चर केला होता.

कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या विजय देवरकोंडा शिव निर्वाण दिग्दर्शित 'कुशी' या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात समंथा हिरोईनची भूमिका साकारत आहे. जयराम, सचिन खेडेकर, मुरली शर्मा, वेनेला किशोर, लक्ष्मी, अली, राहुल रामकृष्ण, श्रीकांत अय्यंगार, शरण्य प्रदीप आणि रोहिणी देखील कलाकारांचा भाग आहेत. दुसरीकडे, रश्मिका मंदान्ना देखील अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. ती वारसुडू, मिशन मजनू, अ‍ॅनिमल आणि पुष्पा: द रुलमध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Stock Market Today : जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; सोनं मात्र तेजीत; कोणत्या शेअर्सला फटका?

T20 World Cup : बांगलादेशची ICC कडून कोंडी! देश नव्हे, फक्त शहर बदलण्याचा ठेवला प्रस्ताव; हेही मान्य न केल्यास...

Bigg Boss विजेता शिव ठाकरे अडकला विवाहबंधनात, गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर लग्नातले फोटो व्हायरल

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SCROLL FOR NEXT