Rashmika Mandanna Birthday: Esakal
मनोरंजन

Rashmika Mandanna Birthday: 'या' व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती नॅशनल क्रश! केला होता साखरपुडा..मात्र

Vaishali Patil

Rashmika Mandanna Birthday: रश्मिका मंदान्ना आज तिचा २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. नॅशनल क्रश बनलेल्या रश्मिकाच्या चाहत्याची सख्या काही कमी नाही. केवळ भारतातच नाही तर तिची प्रसिद्धी ही जगभर पसरली आहे. तिच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पहात असतात.

5 एप्रिल 1996 रोजी जन्मलेल्या रश्मिकाने वयाच्या 19 व्या वर्षी साऊथ फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला. किरिक पार्टी हा त्याचा डेब्यू चित्रपट 2016 मधील सर्वात हिट चित्रपट ठरला. तिच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्यांची तुम्हाला फारशी माहिती नसेल.

तिच्या क्यूटनेसने तिने सगळ्यांनाच वेड लावले आहे. जबरदस्त फॅन फॉलोइंगमुळे ती राष्ट्रीय क्रश झाली आहे. मात्र, तिला ज्याचे वेड लागले तो होता रक्षित शेट्टी. रक्षित शेट्टी हा चित्रपट ७७७ चार्ली फेम अभिनेता आहे. तो रश्मिकाचा एक्स बॉयफ्रेंड आहे. रश्मिका रक्षितच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिने त्याच्याशी साखरपुडा देखील केला होता. दोघांच्या वयात 12 वर्षांचे अंतर होते.

रश्मिकाने रक्षितच्या प्रोडक्शन हाऊससोबत तिचा पहिला चित्रपट सुरू केला. दोघांची पहिली भेट किरिक पार्टी चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हळूहळू रश्मिका आणि रक्षित जवळ आले आणि नंतर 2017 मध्ये रश्मिकाने स्वतः रक्षितसोबतचे नाते अधिकृत केले.

काही दिवसांनी दोघांचीही एंगेजमेंट झाली. मात्र 2018 मध्येच, दोघांमध्ये तणाव निर्माण झाला आणि त्याच नातं तुटलं. मीडिया रिपोर्ट्समध्ये अशा काही गोष्टी आहेत की, कम्पॅटिबिलिटीच्या मुद्द्यावरून दोघांचे नाते तुटले होते. त्याचवेळी, असे देखील म्हटले जाते की रश्मिकाला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते, ज्यामुळे नात्यात दुरावा आला आणि दोघे वेगळे झाले. मात्र, दोघेही याबाबत कधीच बोलले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT