Rashmika Mandanna confirms the rumour with Tiger shroff,post a video on social media| Instagram
मनोरंजन

टायगर श्रॉफसोबतच्या 'त्या' अफवेला रश्मिका मंदानानं केलं कन्फर्म, चाहते खूश

रश्मिका मंदानानं आपल्या इन्स्टा स्टोरीत टायगर श्रॉफ सोबतचा एक क्यूट व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे.

प्रणाली मोरे

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna) संदर्भात गेल्या काही दिवसांपासून एक बातमी जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. बातमी होती की,रश्मिका मंदानाला एक मोठा बॉलीवूड सिनेमा मिळाला आहे. ज्यात 'बागी' स्टार टायगर श्रॉफ(Tiger Shroff) सोबत ती रोमान्स करताना दिसणार आहे. या बातमीनं सोशल मीडियावर मात्र चर्चेला उधाण आलं होतं. अनेक जण वेगवेगळे तर्क-वितर्क लावत होते. अखेर रश्मिकानंच एक व्हिडीओ(Video) पोस्ट करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रश्मिका मंदानानं टायगर श्रॉफसोबत एक व्हिडीओ शेअर करत एक खरी गूड न्यूज सांगितली आहे.(Rashmika Mandanna confirms the rumour with Tiger shroff,post a video on social media)

रश्मिका मंदानानं टायगर श्रॉफ सोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत एक गोष्ट तर कन्फर्म केली आहे की हे दोघेही लवकरच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. पण कोणत्याही सिनेमात हे दोघे काम करत नसून एका जाहिरातीमध्ये दोघे एकत्र दिसणार आहेत. रश्मिका मंदानानं हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिलं आहे की ,''अफवा खरी होती मित्रांनो,खूप हसू येतंय याक्षणी मला..टायगर श्रॉफ आणि मी एका जाहिरातीचं शूट संपवलेलं आहे. टायगर सोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. जाहिरातीच्या मी प्रतिक्षेत आहे''. रश्मिका मंदाना आणि टायगर श्रॉफचा हा क्यूट व्हिडीओ आपण बातमीत लिंक जोडलेली आहे तिथे पाहू शकाल.

अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर रश्मिका मंदाना सध्या बॉलीवूड आणि साउथ इंडस्ट्रीतही टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. रश्मिकाकडे सध्या थलापति विजयचा 'वरिसु' सिनेमा आणि अल्लु अर्जूनचा 'पुष्पा २' आहेच,त्यासोबत बॉलीवूडचे 'गूडबाय','मिशन मजनू','एनिमल' सारखे प्रोजेक्ट देखील आहेत. सर्वच सिनेमात रश्मिका मुख्य भूमिका साकारत आहे. तर दुसरीकडे टायगर श्रॉफ,वरुण धवन,विक्की कौशल सोबत जाहिरातीही तिनं केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT