Rashmika Mandanna, Vijay Deverakonda Instagram
मनोरंजन

Rashmika Mandanna: अखेर विजय देवरकोंडा सोबतच्या रिलेशनशीपवर रश्मिकानं सोडलं मौन, ट्वीट करत म्हणाली,'अय्यो...'

गेल्या काही दिवसांपासून रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या रिलेशनशीपच्या बातम्यांनी जोर धरला होता.

प्रणाली मोरे

Rashmika Mandanna: साऊथ इंडस्ट्रीची 'श्रीवल्ली' म्हणजे रश्मिका मंदाना 'पुष्पा' सिनेमात दिसली अन् जगभरात प्रसिद्ध झाली. हिंदी प्रेक्षकांमध्ये तर अभिनेत्रीविषयी जबरदस्त क्रेझ पहायला मिळते. सोशल मीडियावर देखील तिचं फॅनफॉलॉइंग वेगानं वाढत आहे.

२७ वर्षीय रश्मिका मंदाना सिंगल आहे आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी नेहमीच बरंच काही कानावर पडत असतं. गेल्या काही दिवसांपासून तिचं नाव विजय देवरकोंडा सोबत जोडलं जात आहे.(Rashmika Mandanna reacts on netizens tweet and open up on her relationship with vijay deverakonda)

सोशल मीडियावर काही फोटो समोर आले आहेत ज्यात हे दोन्ही स्टार्स एकाच लोकेशनचे फोटो शेअर करताना दिसले. बस झालं...चाहत्यांनी सुतावरनं स्वर्ग गाठला आणि बातमी पसरली की दोघांमध्ये अफेअर सुरू झाले. अर्थात दोघांनी हे फोटो एकत्र शेअर केले नव्हते. पण चाहत्यांचे मात्र आपल्या लाडक्या स्टार्सच्या हालचालीवंर बारीक लक्ष असते.

जेव्हा रश्मिकाला माहित पडलं की तिचं नाव विजय देवरकोंडासोबत जोडलं जातंय तेव्हा तिनं यावर रिअॅक्ट करायला क्षणाचाही विलंब केला नाही. एका ट्वीटर पेजनं दावा केला आहे की अभिनेत्रीनं विजय देवरकोंडाची फेव्हरेट रिंग आपल्या बोटात घातली आहे. फोटोत तिच्या हातात रिंग पाहिली देखील जाऊ शकते.

हेही वाचा: सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

पण रश्मिकानं यावर आपलं स्पष्टिकरण दिलं आहे आणि इतकं सगळं प्रूव्ह करुनही अभिनेत्रीनं विजय देवरकोंडा सोबतच्या नात्याचा स्विकार केलेला नाही. तिनं ट्वीटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की-''अय्यो...याविषयी इतका विचार नका करू बाबू...''

रश्मिकानं नुकताच आपला २७ वाढदिवस साजरा केला. यादरम्यान ती विजय देवरकोंडाच्या घरी देखील नजरेस पडली होती. याच बातमीनं या दोघा स्टार्सच्या रिलेशनशीपला हवा दिली होती.

सगळ्यात आधी दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे याची कुजबुज तेव्हा सुरू झाली जेव्हा मालदीव व्हॅकेशनचे दोघांचे फोटो समोर आले. दोघांनी सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले होते. पण दोघांचा एकत्रित असा एकही फोटो समोर आला नव्हता. आता हे पाहणं महत्त्वाचं असेल की खरंच दोघं रिलेशनशीपमध्ये आहेत की नाही...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT