rasika sunil and aditya bilagi 
मनोरंजन

Video : 'घुंगरू' गाण्यावर रसिका सुनीलच्या बॉयफ्रेंडचा धमाकेदार डान्स

स्वाती वेमूल

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे फार चर्चेत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रसिकाने रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. आदित्य बिलागी या तरुणाला ती डेट करत असून या दोघांची ओळख लॉस एंजिलिसमध्ये झाली होती. हेलिकॉप्टरद्वारे लॉस एंजिलिसची सफर घडवून आदित्यने अत्यंत अनोख्या पद्धतीने रसिकाला प्रपोज केलं होतं. या प्रपोजलचा व्हिडीओ रसिकाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तेव्हापासून हा आदित्य नेमका आहे तरी कोण, अशी चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली होती. आदित्यला डान्सची फार आवड असून त्याचा स्वत:चा युट्यूब चॅनलसुद्धा आहे. त्यावर डान्सचे विविध व्हिडीओ तो पोस्ट करत असतो. त्याचा असाच एक डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आदित्य हा एका तरुणीसोबत हृतिक रोशनच्या 'घुंगरू' या गाण्यावर अफलातून डान्स करताना दिसतोय. आदित्यसोबत दिसणारी तरुणी इमान हीसुद्धा डान्सर असून तिचेही व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर अनेक डान्स पेजेसवर हा व्हिडीओ पाहायला मिळतो. 

आदित्य डान्सर आणि कोरिओग्राफर असून त्याच्या युट्यूब चॅनलचे लाखो सबस्क्राइबर्स आहेत. यासोबतच तो मार्शल आस्टिस्टसुद्धा आहे. रसिका ही उच्च शिक्षणासाठी लॉस एंजिलिसला गेली असता तिथे तिची आदित्यशी पहिल्यांदा भेट झाली. या भेटीचं मैत्रीत रुपांतर झालं आणि हळूहळू मैत्रीने प्रेमाचं रुप घेतलं. परदेशात शिक्षण घेतल्यानंतर रसिका पुन्हा एकदा 'शनाया'च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. काही दिवसांपूर्वीच 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT