मनोरंजन

'शेवंता'चं पुनरागमन चुकविणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका

'रात्रीस खेळ चाले ३' १६ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला

स्वाती वेमूल

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेने प्रेक्षकांचं अफाट प्रेम मिळवून अगदी पहिल्या पर्वापासूनच लोकप्रियतेचे शिखर गाठले. लॉकडाउनमुळे शूटिंग बंद असल्यानं ‘रात्रीस खेळ चाले ३’ ही लोकप्रिय मालिका प्रसारित होत नव्हती. पण लवकरच शूटिंग सुरू होऊन या महिन्यात ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. मालिकेचे लेखक प्रल्हाद कुडतरकर यांनी तसे संकेत दिले होते. येत्या १६ ऑगस्टपासून रात्री ११ वाजता पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या मालिकेतील सर्व कलाकार प्रेक्षकांचे अत्यंत आवडते आहेत आणि त्यातील एक व्यक्तिरेखा जिची मालिकेत प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत ती म्हणजे शेवंता. नुकतंच रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आणि त्यात सगळ्यांच्या काळजाचा ठाव घेणारी शेवंता प्रेक्षकांना दिसली. पण यावेळी तिला पाहून फक्त काळजाचा ठोका चुकणार नाही तर थांबेल कायमचा असा इशारा देणाऱ्या प्रोमोची चर्चा आता सर्वत्र होतेय. नव्या प्रोमोमधील शेवंताच्या अदा आणि त्याचवेळी तिचं चित्तथरारक रूप पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लेखकाच्या नजरेतून 'रात्रीस खेळ चाले ३'

'अण्णा नाईकांच्या पापामुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त आत्म्यांनी दिलेले शाप भोगावे लागले. अण्णा नाईकांच्या पुढच्या पिढीची वाताहात झाली. अत्रुप्त आत्म्यांनी नाईक वाड्याचा ताबा घेतला. एक नांदतं घर बघता बघता रसातळाला गेलं. पण या आलेल्या वादळात अण्णा नाईकांची बायको इंदू उर्फ माई नाईक घराण्याच्या मूळ पुरुषावर आणि कुलदैवतेवर भार टाकून सगळ्या संकंटांशी शेवटपर्यंत लढते. आपल्या उध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते. एक अशिक्षित स्त्रीसुद्धा आपला स्वाभिमान जपून, संपूर्ण घराला पुन्हा उभं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगते आणि त्यात जिंकून दाखवते, त्याची ही एक रंजक कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नाईक घराण्याचं पाप, शाप आणि उ:शाप यामधून झालेलं संक्रमण म्हणजेच रात्रीस खेळ चाले भाग १,२ आणि ३ असं म्हणता येईल,' असं लेखक राजेंद्र घाग कथेविषयी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir: काश्मीरच्या कुलगाममध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; मजुरांवर दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या तरुणाचा मृत्यू

उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीला हजेरी, घरी जाताच घेतली ४५ लाखांची लाच; बीडमध्ये विभागीय वनअधिकाऱ्यांला रंगेहात पकडलं

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

MBBS Bond: एमबीबीएस डॉक्टरांचा ‘बॉण्ड’ अखेर रद्द! राज्य शासनाचा मोठा निर्णय; वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे धोरणात बदल

Dhom Dam: वाईत धोक्याची घंटा! धोम धरणाचा विसर्ग वाढला; महागणपती मंदिरात घुसले पुराचे पाणी

SCROLL FOR NEXT