मनोरंजन

'रात्रीस खेळ चाले'बंद झाली अन् शेवंता म्हणते...

सागर दिलीपराव शेलार

पुणे : प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेली मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले' होय. या मालिकेने शनिवारी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धि मिळाली. ही मालिका लागताच प्रेक्षक हातातली कामे सोडून मालिका पाहायला बसत. ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. यामधील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या जिवाचं झालं होतं. मालिकेच्या निरोपाच्या निमित्ताने आलेला अनुभव सांगताना प्रेक्षकांची आवडती शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तिने इन्स्टाग्रामवरती व फेसबुकवरती पोस्ट लिहून आपली भावना व्यक्त केली आहे. 

या मालिकेच्या शेवटच्या भागाच्या निमित्ताने अपूर्वाने आपल्या अनुभवाविषयी इन्स्टाग्राम व फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. यावेळी अपुर्वा ही खुपच भावनिक झाली होती. या मालिकेमुळे यातील शेवंता पात्रामुळे ती महाराष्ट्रातील घराघरांत पोहचली आहे. या मालिकेतील  इतर पात्रांचेही तिने काैतुक केले.  

ती म्हणाली की, नमस्कार मित्रांनो, ''सर्वप्रथम मी आशा करते की आपली आणि जीवलगांची काळजी घेत आहात..वेळ कठीण जरी असेल तरी आपण पुन्हा जोमाने उभे राहुया..जसे की आपल्याला ठाऊक असेलच की आपली लाडकी मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले 2 आपला निरोप घेत आहे..हे लक्षात येताच खूप आठवणी आज पुन्हा दाटून आल्या.

ती पुढे म्हणते, पहिल्या भागाचे गुपित ह्या भागात उलगडणार आहे म्हटल्यावर शेवंता ह्या भूमिकेचे महत्त्व हे वेगळ्या प्रकारची जबाबदारी स्वीकारून मी पुन्हा टीव्हीवर यायचे ठरवले.. जबाबदारी म्हटली की दडपणाखाली असणे साहजिक होते.. पण त्यातून आपली ओळख पुन्हा निर्माण करायची एक सुवर्ण संधी ह्यातून मला दिसली.. आणि त्याला दिलेला प्रतिसाद त्याची पावती देऊन गेला.

दरम्यान, या मालिकेचा पहिला भाग 2015 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याच्या दुसऱ्या भागात या मालिकेचा प्रिक्वेल दाखवण्यात आला होता. त्यामुळे पहिल्या भागाची सुरुवात ज्या एपिसोड पासून झाली होती, त्या एपिसोडने या दुसऱ्या भागाचा शेवट झाला होता. या मालिकेतील अण्णा नाईक, इंदू नाईक, शेवंता, माधव, दत्तापासून ते वच्छी, चोंट्या अशा वेगवेगळ्या पात्रांना प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली. यावेळी अपुर्वाने झी मराठीचेही आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT