salman raveena 
मनोरंजन

सलमान खानवर हक्क गाजवायला 'बिग बॉस'मध्ये येतेय रविना टंडन, सोबतंच रविवार ठरणार खास

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- ख्रिसमसमुळे संपूर्ण देशात सेलिब्रेशनचं वातावरण आहे. २०२० हे वर्ष आता संपत आलं आहे. जगभरात सुरु असलेल्या या सरत्या वर्षाचं सेलिब्रेशन लोक आनंदाने करत आहेत. अशातंच टीव्ही मालिकांमध्ये देखील हे सेलिब्रेशन पाहायला मिळेल. 'बिग बॉस'च्या घरात देखील असंच काहीसं वातावरण आहे. यावेळी रविवारच्या एपिसोडमध्ये रवीन टंडन तिचा पहिला वहिला हिरो सलमान खानवर हक्क गाजवायला येणार आहे. 

ख्रिसमसच्या निमित्ताने घरातील सदस्यांना पत्र लिहिले गेले आहेत. ही पत्र शोच्या स्पर्धकांसाठी त्यांच्या घरातल्यांनी पाठवलेली आहेत. असं दिसतंय की अशाप्रकारे हे गिफ्ट पाहिल्यानंतर घरातील स्पर्धक भावूक होतील आणि घरातील वातावरण काही वेळासाठी बदलेल. ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी घरात नाचगाण्यांचा देखील कार्यक्रम होणार असल्याचं कळतंय. हे सेलिब्रेशन आणखी उत्साहवर्धक होण्यासाठी विकेंडच्या वारमध्ये रविना टंडल धमाल करताना दिसणार आहे. शोच्या निर्मात्यांनी एक नवीन प्रोमो रिलीज केला आहे.

प्रोमोमध्ये दिसून येतंय की स्पर्धक गार्डन एरियामध्ये नाचता गाताना दिसत आहेत. तर दुसरीकडे घरातील पत्र वाचून भावूक होताना दिसतायेत. प्रेक्षकांसाठी ही एक ट्रीट आहे की घरातील सगळे रुसवे फुसवे विसरुन एकत्र दिसत आहेत. यावेळी खास गोष्ट म्हणजे रविवारी विकेंडच्या वार दिवशी २७ तारीख आहे. या दिवशी सलमानचा बर्थ डे देखील आहे.  'द खबरी'च्या रिपोर्टनुसार, रविवारी शोमध्ये रविना टंडनसोबत जॅकलीन फर्नांडिस, धर्मेश, शहनाज गिलदेखील घरात दिसतील.   

raveena tandon is coming on bigg boss 14 the first title on the first hero salman khan  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EWS अन् राज्याचं 10 टक्के आरक्षण नको, शिकलेल्या मराठ्यांनी जाहीर कराव; छगन भुजबळांचं आव्हान

'खाकी अंगावर घातली की जात-धर्म विसरा'; अकोला दंगलप्रकरणी हिंदू-मुस्लिम अधिकाऱ्यांची SIT स्थापन करण्याचे Supreme Court ने का दिले आदेश?

Viral Video: आजीने आजोबाचे लावून दिले दुसरे लग्न, नातीने कारण विचारताच मिळाले 'हे' उत्तर; ऐकून डोळे पाणावतील, पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ

Beed Crime : माजी उपसरपंच प्रकरणात धक्कादायक वळण; बार्शी तालुक्यात कारमध्ये मृतदेह सापडला, नातेवाइकांचा संशय

Mumbai Pollution: धूळ नियंत्रणासाठी कठोर नियमावली, हिवाळ्यापूर्वी लागू करण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT