Raveena Tandon doesn‘t want to do tip tip barsa paani, Know why Google
मनोरंजन

Raveena ला करायचंच नव्हतं टीप टीप बरसा पानी हे गाणं,कारणही पुढं केलेलं पण..

'मोहरा' सिनेमाचे पटकथाकार शब्बीर बॉक्सवाला यांनी त्यांच्या एका मुलाखतीत याविषयी मोठा खुलासा केला होता.

प्रणाली मोरे

रवीना टंडनचं (Raveena tandon) सगळ्यात प्रसिद्ध गाणं असलेलं 'टीप टीप बरसा पानी'(tip tip barsa paani) हे १९९४ मध्ये रिलीज झालेल्या 'मोहरा'(Mohra) सिनेमातलं सुपरहिट गाणं. कानाला श्रवणीय म्हणून तर चाहते प्रेमात पडलेच या गाण्याच्या, पण हे ज्या बोल्ड पद्धतीनं शूट केलं होतं ते देखील वाहवा मिळवून गेलं. या गाण्यात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रवीना एकदम झक्कास शोभून दिसली होती जोडी.(Raveena Tandon doesn‘t want to do tip tip barsa paani, Know why)

पण आता याच सिनेमाचे पटकथाकार शब्बीर बॉक्सवाला यांची एक मुलाखत समोर आली आहे,ज्यात ते म्हणताना दिसत आहेत की रवीनाला हे गाणं करायचच नव्हतं. रवीनाला वाटत होतं की इतकं बोल्ड गाणं केलेलं तिच्या वडीलांना आवडणार नाही. पण शेवटी रवीनाला सिनेमाचे दिग्दर्शक राजीव राय यांनी कसंबसं मनवलं आणि सिनेमात येणाऱ्या प्रसंगानुरुप ते गाणं आहे,उगाचच मुद्दामहून टाकलेलं नाही हे सांगून गाणं करण्यासाठी तिचं मन वळवलं.

आपल्या एका जुन्या मुलाखतीत रविनाने देखील म्हटलं होतं की 'टीप टीप बरसा' हे गाणं करण्यासाठी तिच्या मनाची तयारी होत नव्हती. महत्त्वाचं म्हणजे ती कम्फर्टेबल नव्हती अशा पद्धतीची गाणी किंवा सीन करण्यासाठी. पण मोहरा साठी तिला तयार करण्यात आलं. पण हे गाणं खूपच छान पद्धतीनं शूट करण्यात आलं आणि त्याची कोरिओग्राफी देखील खूप मस्त केल्याचं अभिनेत्रीनं म्हटलं होतं. ते गाणं कुठेच अश्लीलतेकडे झुकत नव्हतं असं देखील रवीनाने त्यावेळी म्हटलं होतं. आपल्या संबंध करिअरमध्ये अशा पद्धतीचं गाणं किंवा सीनही आपण केला नसल्याचं देखील रवीनानं आवर्जुन सांगितलं होतं.

रविना त्या गाण्याविषयी म्हणाली होती,''हे गाणं शूट करायला ४ दिवस लागले. ते एका बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन साइटवर शूट करण्यात आलं होतं. तिथे सगळीकडे आजुबाजूला दगड,खिळे अशा बऱ्याच गोष्टी पडल्या होत्या ज्यानं इजा होण्याची शक्यता होती. आणि अशा जागेत आपल्याला चप्पल न घालता शूट करायचं होतं. शिवाय सतत अंग भिजलेलं दाखवण्यासाठी पाण्याचा मारा सुरू होता,ज्यानं आपल्याला तापही आला होता'', असं देखील रवीना म्हणाली होती.

'टीप टीप बरसा' या गाण्याचं नवीन व्हर्जन आपण 'सुर्यवंशी' या रोहित शेट्टीच्या सिनेमात काही दिवसांपूर्वीच पाहिलं असेल. हे नवीन गाणं कतरिना कैफ आणि अक्षय कुमारवर चित्रित करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Statue of Liberty: काही सेकंदात भीषण दुर्घटना… स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचानक कोसळली, थरारक VIDEO व्हायरल

Buldhana Accident: मंगरूळ नवघरे येथे काळी पिवळी आणि दुचाकीची भीषण धडक; ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Breaking: लागा तयारीला... BCCI ने जाहीर केली IPL 2026 च्या तारखा; फ्रँचायझींना ई-मेल अन्...

Kolhapur Young Footballers Meet Messi : वानखेडेवर ‘लय भारी’ क्षण; मेस्सीने खेळवले, टिप्स दिल्या आणि कोल्हापूरकरांचा अभिमान वाढवला

Municipal Corporation Election : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT