Raveena Tandon Jyotirlinga Trip: Esakal
मनोरंजन

Raveena Tandon: "केदारनाथ ते रामेश्वरम…" रवीना टंडनने लेकीसोबत पुर्ण केली 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा! फोटो व्हायरल

रवीना टंडनने मुलगी राशा थडानीसोबत केले 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन!

Vaishali Patil

Raveena Tandon Jyotirlinga Trip: गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं चाहत्यांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री रवीना टंडन ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पद्मश्री पुरस्कार विजेती रवीना आजही आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातले.

रवीना टंडन नुकतीच धार्मिक यात्रेवर गेली होती. रवीना टंडनने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून ही माहिती दिली आहे. रवीनाने तिची मुलगी राशा थडानीसोबतचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती आणि तिची मुलगी राशाने 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे. याचे फोटो सोशल मीडियावर शेयर करत रवीनाने एक भावनिक नोट शेअर केली आहे.

रवीनाने यावेळी पारंपारिक वेषात देवदर्शन केले. तिने क्रीम रंगाची साडी नेसली होती, मॅचिंग कानातले, मेकअप आणि अंबाड्यासह अँटीक-स्टाईल नेकपीसने घालून तिने तिचा लूक पुर्ण केला होता तर दुसरीकडे, राशाने गुलाबी शरारा परिधान केला होता.

त्यांची ही यात्रा केदारनाथ धामपासून सुरू होऊन रामेश्वरम मंदिरात संपली. त्यांनी राम सेतूला भेट दिली. जिथे पुरोहितांची भेट घेऊन त्यांचे विशेष आशीर्वाद घेतले. रवीनासोबत तिची मुलगी राशा थडानीचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

हे फोटो शेयर करत रविनाने कॅप्शनमध्ये लिहिले, “केदारनाथ ते रामेश्वरम… 12 पवित्र ज्योतिर्लिंग पूर्ण करण्याचे आमचे ध्येय… प्रत्येक गोष्टीसाठी शिवाचे आभार… हर हर महादेव, जय भोलेनाथ शिव शंभू….” यासोबत तिने श्री राम…. #रामसेतू #रामेश्वरम #धनुस्कोडी #फ्लोटिंग स्टोन्स हे हॅशटॅग वापरले आहेत.

रविनाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, तिने अनिल थडानी यांच्याशी लग्न केले आहे आणि त्यांना मुलगी राशा आणि एक मुलगा आहे. रविना आता लवकरच अक्षय कुमारसोबत वेलकम टू जंगलमध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muhurat Trading 2025: 'मुहूर्त ट्रेडिंग'च्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 267 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स चमकले?

Bhandara News: भंडाऱ्यातील पोलिस पाटील भरती प्रक्रिया रद्द; उच्च न्यायालय, संपूर्ण निवड प्रक्रिया संशयास्पद आणि अयोग्य

Heart Attack Case : महाकाल मंदिरात भस्मआरतीदरम्यान भक्ताचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; WhatsApp स्टेट्सवर लिहिलं होतं, 'आयुष्य क्षणभंगुर आहे...'

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या एसटीपीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता; पाच कोटींचं विशेष अनुदान

Kolhapur Killing Mystery : कोल्हापुरातील 'त्या' दोघांचा बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू नाहीचं, वृद्ध दांपत्याच्या मृत्यूचे गूढ वाढले

SCROLL FOR NEXT