Raveena Tandon hits back at troll who compared her with Sonam Kapoor Google
मनोरंजन

'सोनम तुझ्यापेक्षा समंजस'; तुलना करणाऱ्या ट्रोलरवर भडकली रवीना ,म्हणाली...

रविना टंडनननं ट्रोलिंगवर पलटवार केल्यांनतर तिला ट्रोल करणाऱ्यानं त्याचं ट्वीटच डिलिट केलं आहे.

प्रणाली मोरे

रविना टंडन(Raveena tandon) ही गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर भरपूर सक्रिय दिसते. ती नेहमी तिचे फोटो,व्हिडीओ,सिनेमा संदर्भातील अपडेट्स शेअर करताना दिसते. पण हे सगळं करताना ती नेहमीच तिच्या मनातील भावना योग्य पद्धतीत,खुल्या-स्वच्छ मनानं सोशल मीडियावर मांडताना दिसते. आतापर्यंतच्या तिच्या कोणत्याही पोस्टमधून किंवा ट्वीटमधून तिनं समोरच्याच्या भावना दुखावतील किंवा हेतुपुरस्सर असं काहीही आपल्या पोस्टमधून म्हटलेलं नाही. पण तरीदेखील तिच्या एका वैचारिक ट्वीटवरुन तिची तुलना सोनम कपूरशी(Sonam Kapoor) करत तिला ट्रोल करण्यात आलं. आता या सगळ्या ट्रोलर्सना रविनानं योग्य-अचूक शब्दात पलटवार करीत ट्रोलिंगला उत्तर दिलं आहे.रविनानं ट्वीटरवर मागे एक ट्वीट केलं होतं,ज्यात तिनं लिहिलं होतं, ''आपण सगळे एका सहनशीलतेच्या शर्यतीचा भाग आहोत,पुढेही असू आणि या अवस्थेत आपल्याला कायम रहावं लागणार. आपण एका स्वतंत्र देशात राहतो. इथे कुणाचीही पुजा आपण करू शकतो. सगळ्यांना इथे सारखा न्याय दिला जातो''.

तिच्या याच ट्वीटला ट्रोल करीत एक ट्रोलर म्हणाला होता,''काय मुर्खपणाचे विचार मांडलेयत या ट्वीटमधून. मग काय आपण ओसामा,कसाब,अफझल गुरु,यासिन मलिक,हाफिझ सईद,मस्जिद अझर यांनाही भारतात सर्वांना समान कायदा-न्याय म्हणून सहन करत बसायचं का,यांची पूजा करायची का? आता वाटतंय सोनम कपूर तुझ्यापेक्षा जरातरी समंजसपणानं बोलते''.

ट्रोलर्सला यावर पलटवार करताना रविना म्हणाली,''मला हे वाचून दुःखं होतंय की तुम्ही पूजेची तुलना ज्या नावांशी केलीत ते एखाद्या सैतानापेक्षा भयानक आहेत. ज्यांना मला काय म्हणायचं आहे ते बरोबर समजले,ज्यांना कळलं नाही मला काय म्हणायचं आहे ते समजदार नाहीत''. रविनाच्या या ट्वीटनंतर त्या रविनाला ट्रोल करणाऱ्या ट्रोलरनं आपलं ट्वीट डीलिट केलं आहे.

रविना आपल्या ब्लॉकबस्टर KGF Chapter 2 मध्ये दमदार भूमिकेत दिसली होती. या सिनेमात तिनं रमिका सेन ही व्यक्तीरेखा साकारली होती. या सिनेमातील तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या प्रशंसेस पात्र ठरली होती. या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार यश आणि बॉलीवूडचा खलनायक संजय दत्त हे महत्त्वाच्या भूमिकेत होते. या सिनेमानं जगभरात बॉक्सऑफिसवर दणकून कमाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

SCROLL FOR NEXT