Raveena Tandon
Raveena Tandon  
मनोरंजन

शिल्पा शेट्टी, काजोलशी तुझे वाद होते का?, या प्रश्नावर रवीना म्हणाली..

स्वाती वेमूल

९० च्या दशकात रवीन टंडनचा (Raveena Tandon) बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये समावेश व्हायचा. तिने त्यावेळच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यानंतर रवीनाचं लग्न झालं, ती संसारात रमली. बॉलिवूडपासून लांब गेलेली रवीना काही निवडक चित्रपटांमध्ये दिसली. अलीकडचे ती 'अरण्यक' या क्राइम थ्रिलर चित्रपटात दिसली. या चित्रपटातील तिच्या कामाचं खूपच कौतुक झालं. 'चित्रपटसृष्टीत ऐन भरात असताना काही चित्रपटांमधून आपल्याला काढून टाकण्यात आलं होतं. हिरोच्या गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरुन आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला', असा दावा रवीनाने अलीकडेच एका मुलाखतीत केला. ज्या हिरोंनी तिला बाहेर काढायला लावलं, त्यांची प्रेम प्रकरणं तुटल्यानंतर ते आपल्याकडे चित्रपटांची ऑफर घेऊन आले होते, असं रवीनाने सांगितलं.

'हिरोच्या गर्लफ्रेंड्सना मी आवडत नव्हते. त्या स्वत:ला असुरक्षित समजत होत्या. त्यामुळे जाणीवपूर्वक आपल्याला चित्रपटातून काढण्यात आलं', असा दावा रवीनाने केला. 'ती त्यावेळी एका हिरोला डेट करत होती. त्यावेळी आमची जोडी खूप हीट होती. पण तिने माझी भूमिका बदलायला भाग पाडलं. त्यामुळे मला एक-दोन चित्रपटांवर पाणी सोडावं लागलं'; असं रवीनाने सांगितलं.

९० च्या दशकात करिष्मा कपूर, काजोल आणि शिल्पा शेट्टी या सुद्धा आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यांच्याबरोबर तुझी स्पर्धा होती का? या प्रश्नावर आमच्यात अशी कुठलीही स्पर्धा नव्हती किंवा घाणेरडं राजकारण नव्हतं, असं रवीनाने सांगितलं. 'शिल्पा आणि माझ्यामध्ये पहिल्या दिवसापासून मैत्री होती. आम्ही एकत्र चित्रपटांमध्ये काम केलं आहे. काजोल आणि माझी मैत्री होती. असं भांडण, वाद वैगेरे आमच्यात काही नव्हतं. काही जणांनी घाणेरडं राजकारण केलं, खूप वाईट गॉसिप केलं, मी या सगळ्यापासून लांब राहिले, याचा मला आनंद आहे' असं रवीना म्हणाली.

९० च्या दशतकात रवीनाचं टीप-टीप बरसा पानी हे गाणं खूप गाजलं होतं. मागच्या वर्षी रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या सूर्यवंशी चित्रपटासाठी हे गाणं पुन्हा रिक्रिएट करण्याचा निर्णय झाला. त्यावरुन बरेच वादविवाद झाले. त्यावर रवीनाने 'गाण्याचं रिक्रिएशन खूप चांगल्या पद्धतीने केलं, मला ते आवडलं' असं कपिल शर्मा शो मध्ये सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT