raveena tandon
raveena tandon 
मनोरंजन

रविना टंडनने केली इंडस्ट्रीची पोल खोल म्हणाली, इंडस्ट्रीतील काही हिरो आणि त्यांच्या गर्लफ्रेंड्स करिअर उद्ध्वस्त करतात

सकाळवृत्तसेवा

मुंबई- अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. बी-टाऊनमध्ये आता या वरुन वाद सुरु होत दोन गट पडण्यास देखील सुरुवात झाली आहे. सगळ्यात आधी कंगना रनौतने सुशांतच्या आत्महत्येला बॉलीवूडच्या घराणेशाहीला जबाबदार ठरवलं. त्यानंतर विवेक ऑबेरॉय आणि प्रकाश राज यांनी बॉलीवूडवर निशाणा साधला. आणि आता तर अभिनेत्री रविना टंडनेही बॉलीवूड इंडस्ट्रीवर प्रश्नांचा घेराव टाकलाय.

अभिनेत्री रविना टंडनने आज एकामागोमाग एक अनेक ट्विट केले आणि या ट्विटमध्ये तिच्यासोबतचा अनुभव देखील शेअर केला. ती म्हणाली की बॉलीवूडमध्ये उद्ध्वस्त करणारी खोट्या माध्यमांची कथा आणि कँप चालतात. रविनाने अनेक ट्विट केले आणि त्यात तिचं मत मांडलं.

ती लिहिते, 'या इंडस्ट्रीमध्ये स्वार्थी मुलींची टोळी असते. मजा करण्यासाठी, हिरोंमार्फत सिनेमातून काढून टाकलं जातं, त्यांच्या गर्लफ्रेंड्स, चमचे पत्रकार आणि त्यांचं करिअर मिडियाच्या खोट्या रचलेल्या कथांमधून उध्स्वस्त केलं जातं. कित्येकदा संपूर्ण करिअर खराब होतं. तुम्हाला त्यात टिकून राहण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. लढावं लागतं. यात काहीजण टिकतात तर काहीजण टिकत नाहीत.' 

हे सांगताना रविनाने स्वतःचा अनुभव देखील शेअर केला आहे. 'हे कोणासोबतंही घडू शकतं जो या इंडस्ट्रीत जन्माला आला आहे, इनसायडर जसं मी ऐकते की काही अँकर्स इनसायडर, आऊटसायडर असं ओरडत आहेत. परंतु तुम्ही लढत राहता. जेवढं त्यांनी मला खाली पाडण्याचा प्रयत्न केला तेवढ्याच वेगाने मी पलटून मी त्यांच्याशी लढली. घाणेरडं राजकारण सगळ्याच ठिकाणी असतं. मात्र आपण लढत राहिलं पाहिजे.'   

raveena tandon says mean girl gangs and camps exist in bollywood who destroyed career  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT