Raveena Tandon compare Tollywood and Bollywood esakal
मनोरंजन

Raveena Tondon : 'बॉलीवूडपेक्षा टॉलीवूड नेहमीच सरस, ते नेहमीच....' ! रविनानं दिली सणसणीत प्रतिक्रिया

प्रसिद्ध अभिनेत्री रविना ही आता तिच्या एका प्रतिक्रियेमुळे चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे

Raveena Tandon compare tollywood and Bollywood : प्रसिद्ध अभिनेत्री रविना ही आता तिच्या एका प्रतिक्रियेमुळे चर्चेत आली आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या भूमिकांमुळे चाहत्यांच्या मनात घर केलेल्या रविनाची लोकप्रियता मोठी आहे. आता तिनं बॉलीवूड आणि टॉलीवूड यांच्यात तुलना करत दिलेली प्रतिक्रिया चाहत्यांच्या रोषाचे कारण ठरताना दिसत आहे.

यापूर्वी रविना ही टॉलीवूडच्या यशच्या केजीएफमध्ये दिसली होती. त्यात तिनं मुख्यमंत्र्याची भूमिका साकारली होती. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. रविनानं टॉलीवूडचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. जे कुणी टॉलीवूडच्या चित्रपट मेकर्सला नावं ठेवतात त्यांनी काही गोष्टी समजावून घेण्याची गरज आहे. असे रविनानं म्हटले आहे.

Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

रविनानं हिंदी आणि साऊथमधील चित्रपट तसेच त्यांच्या मेकर्समधील फरक सांगितला आहे. यावेळी तिनं साऊथमधील चित्रपटांचे बदलते स्वरुपही स्पष्ट केले आहे. टॉलीवूड आपल्याला यशस्वी झाल्याचे दिसून येते याचे कारण त्या फिल्म इंडस्ट्रीनं सतत नवनवीन विषय हाताळले. त्यांनी संस्कृती परंपरा चित्रपटाच्या माध्यमातून जपली आहे. याउलट बॉलीवूडनं कायमच पश्चिमी जगताचे अनुकरण करण्यात धन्यता मानली आहे.

त्या मुलाखतीमध्ये रविनानं साऊथच्या कमल हासन, चिरंजीवी, नागार्जून या कलाकारांची नावं घेतली आहे. त्यांच्यासोबत भूमिका करण्याचा अनुभवही शेयर केला आहे. राजश्री अनप्लग्डला दिलेल्या त्या मुलाखतीची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये शिस्त आहे ती मात्र बॉलीवूडमध्ये दिसत नाही. मला तर साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम करताना खूपच आनंद झाला. समाधानही वाटले. त्यांचे चित्रपट लोकप्रिय होतात याला कारण म्हणजे ते रियल स्टोरीला अधिक भर देतात. हिरोइझम क्रिएट करताना वास्तववादी कथेला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे.

साऊथ चित्रपट निर्माते संस्कृती, परंपरा यावर लक्ष केंद्रीत करुन वेगळी कलाकृती देण्याचा प्रयत्न करत असतात. मुंबईमध्ये बॉलीवूड आहे मात्र तिथे वेस्टर्न लाईफचा प्रभाव जास्त दिसून येतो. आपल्या देशात जे आहे ते प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न होत नाही. ही गोष्ट रविनानं यावेळी सांगितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT