ravi 
मनोरंजन

दिग्दर्शक रवी जाधव यांनी शेअर केला अत्यंत हृदयद्रावक व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे सध्या लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक सेलिब्रिटी घरात राहुन कंटाळले आहेत. घरातंच वेळ घालवत त्यांच्या आवडीनिवडींना वेळ देताना दिसत आहेत. तसंच त्यांच्या काही गोष्टींना देखील ते मिस करत आहेत. स्वयंपाक घरात काही जण मन रमवत असले तरी ते संपूर्ण दिवस मात्र बोअर होत आहेत. नेहमीच बिझी असणा-या या सेलिब्रिटींचं सगळं शेड्यूलंच बदललं आहे. या सगळ्यात त्या लोकांचे जास्त हाल होत आहेत जे स्ट्रीट फूड शौकिन आहेत. सध्या अनेकजण स्ट्रीट फूड आवर्जुन मिस करत आहेत..काही दिवसांपूर्वी तर अभिनेत्री धनश्री हिने घरातलंच पाणीपुरीचा ठेला लावलेला आपण पाहीला..मात्र सगळ्यांनाच ते शक्य नाही...यात जर पाहायला गेलं तर मुंबईच्या फास्ट फुडमध्ये वडापाव म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं..असाच एक व्हिडिओ दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.

रवी जाधव यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये टीव्हीच्या स्क्रीनसमोर एक माणूस उभा आहे आणि टीव्हीवर गरमागरम वडापाव बनवतानाची दृश्य पाहायला मिळत आहेत. ते पाहून टीव्ही समोर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या तोंडाला पाणी सुटतं. तो व्यक्ती टीव्हीवरच्या त्या दृश्यांना खरं समजण्याची कल्पना करतो आणि चार वडापाव पार्सल  द्या त्याला चटणी लावा असं त्या ताईंना सांगताना दिसतो.

हा व्हिडिओ वडापाव प्रेमींनी सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल केला आहे.रवी जाधव यांनी हा व्हिडिओ शेअर करताना मनाला चटका लावून जाणारा, काळीज चिरणारा अत्यंत हृदयद्रावक व्हिडिओ असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे. तसंच मिसिंग यू असा हॅशटॅग देखील वापरला आहे..

सध्या सगळ्यांच्याच संयमाची परिक्षा चालू आहे. काही जणांना स्ट्रीटफुड, फास्टफूड, हॉटेलच्या जेवणाची आठवण येत आहे तर या परिस्थितीत काहीजण एकवेळचं खायला मिळावं यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत..   

ravi jadhav craving for a vadapav shared a funny video  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT