Jaya Bachchan  esakal
मनोरंजन

Jaya Bachchan : 'जयाजी तुम्हाला सांगून ठेवतो...' रवि किशन संतापला!

अभिनेता रवि किशन सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. लोकप्रिय खासदार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या रवि किशन हा नेहमीच परखड वक्तव्यांसाठी ओळखला जातो.

युगंधर ताजणे

Ravi Kishan actor MP Angry On Jaya Bachchan : अभिनेता रवि किशन सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. लोकप्रिय खासदार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या रवि किशन हा नेहमीच परखड वक्तव्यांसाठी ओळखला जातो. आताही तो ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चर्चेत आला आहे. त्यानं कास्टिंग काऊचविषयी केलेलं भाष्य वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणानंतर बॉलीवूडमधून वेगवेगळ्या घडामोडी उघडकीस आल्या आहेत. त्यानंतर बॉलीवूडच्या अभिनेत्यांनी केलेल्या खुलाशानंतर बॉलीवूडमधील नको त्या गोष्टी चर्चेत आल्या. अशावेळी रवि किशनच्या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. सुशांतच्या मृत्युनंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनविषयी रवि किशननं प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे जया बच्चन यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली होती.

Also Read - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

रविनं जी प्रतिक्रिया दिली आहे ती चुकीची आहे. कुणामुळे तुम्ही पूर्ण इंडस्ट्रीला नावं ठेवू शकत नाही. असेही जयाजी यांनी म्हटले होते. यानंतर रविनं पुन्हा एकदा त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, जयाजी यांनी माझे विधान चुकीच्या पद्धतीनं घेतले आहे. त्या मला आईसारख्या आहेत. मी त्यांचा आदर ठेवतो. माझे त्यांना सांगणे आहे की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रग्ज जी कीड आहे ती काढून टाकण्याची गरज आहे.

पंजाबमधून बॉलीवूडमध्ये ज्याप्रमाणे ड्रग्ज येते आहे त्याविषयी मी बोललो होतो. जयाजी यांनी माझे म्हणणे चुकीच्या पद्धतीनं घेतले आहे. जर मी ड्रग्ज घेतले असेल तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. माझ्या थाळीत ड्रग्ज आलेलं नाही हे सांगून ठेवतो. असेही रविनं म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT