Ravi Kishan Instagram
मनोरंजन

Ravi Kishan: 'गॅंग्ज ऑफ वासेपूर' मधनं हाकललं होतं रवि किशनला...आंघोळीसाठी केलेली दूधाची डिमांड अन् झोपायला मागितलेलं..

भोजपुरी सुपरस्टार रवि किशननं एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेला खुलासा ऐकून सगळेच हैराण झालेयत.

प्रणाली मोरे

Ravi Kishan: अनेकांना कदाचित माहित नसेल की भोजपुरी सुपरस्टार रवि किशनला अनुराग कश्यपचा आयकॉनिक सिनेमा 'गॅंग्ज ऑफ वासेपूर' ऑफर झाला होता. रवि किशननं एका न्यूज शो मध्ये आपला अहंकार आणि अरेरावीपणामुळे ही संधी आपण गमावल्याचं म्हटलं होतं.

भोजपुरी अभिनेता आणि राजकीय नेता रवि किशननं मुलाखतीत सांगितलं की 'गॅंग्ज ऑफ वासेपूर' सिनेमात काम करण्याच्या बदल्यात आपण आंघोळीसाठी २५ लिटर दूध आणि झोपण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेली गादी मागितली होती .(Ravi Kishan Was rejected for gangs of wasseypur because of this reason ppm81)

रवि किशननं न्यूज शो 'आप की अदालत' मध्ये सांगितलं की,''मी दूधानं आंघोळ करायचो आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेल्या अंथरुणावर झोपायचो. मला वाटायचं की मी अभिनेता आहे आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. लोकं जेव्हा तुम्हाला एलपीचीनो आणि रॉबर्ट डे नीरो चे सिनेमे दाखवतात,आणि बोलतात की हे कलाकार असे वागायचे..तसे वागायचे..तुम्हीसुद्धा तसंच वागा..तेव्हा नकळत त्याच गोष्टी मी करायला लागलो''.

रवि किशन म्हणाला-''असो..ते सगळं उगाचच रंजक करुन सांगायचे. आणि मला वाटायचं की मी दूधाने आंघोळ करून गेलो तर चर्चा होईल की मी दूधाने आंघोळ करतो''.

हेही वाचा: शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

रवि किशन पुढे म्हणाला की,''याच सगळ्या माझ्या डिमांडमुळे माझ्या वाट्याला अपयश आलं. 'गॅंग्ज ऑफ वासेपूर'मध्ये मला घेतलं नाही कारण कोण २५ लिटर दूध रोज आणणार आणि मला आंघोळीला देणार यापेक्षा मला न घेतलेलं बरं सिनेमात असा विचार फिल्मवाल्यांनी केला''.

'' माझं खूप नुकसान झालं यामुळे..मग आपोआप सुटल्या सवयी. किंवा मी सोडून दिल्या असं म्हणूया. मग मात्र यश चाखायला मिळालं.त्यात मुंबई तुम्हाला वेडं बनवते. सगळीकडून मेहनत केल्यावर पैशाचा पाऊस होतो,आता जिथे जातो तिथे लोक फोटो क्लिक करतात. सुपरस्टार रवि किशन बनलो तो आनंद काही औरच''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT