This is the real reason why Shaktimaan stopped airing 
मनोरंजन

'शक्तिमान' परत येतोय; पण ही मालिका बंद का केली होती हे माहितेय का?

सकाळवृत्तसेवा

सोलापूर: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. या विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी देशभरात डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस आपला जीव धोक्यात घालत जनतेची सेवा करत आहेत. या लॉकडाउनचा परिणाम चित्रपट, मालिका, आणि वेबसिरीजवर सुद्धा झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिका पुन्हा एकदा पाहता याव्यात यासाठी काही दिवसांपूर्वीच नव्वदीच्या काळातील 'रामायण' आणि 'महाभारत' या मालिका दूरदर्शन वाहिनीवर पुन्हा दाखवण्यास सुरवात केली आहे.

नव्वदीच्या काळातील आणखीन एक गाजलेली म्हणजे 'शक्तिमान'. भारतातील पहिला सुपरहिरो शो म्हणून ही मालिका ओळखली जाते. नव्वदीच्या काळात या मालिकेला लहानग्यांबरोबरच मोठ्यांचाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. जसे 'रामायण' आणि 'महाभारत' या मालिकांचे पुःप्रसारण सुरू झाले. लगेचच प्रेक्षकांकडून या मालिकेच्या पुःप्रसारणाची मागणी करण्यात आली आहे. आता 'शक्तिमान' मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या मालिकेबाबत 'शक्तिमान' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनी एक मोठा खुलासा केला आहे. लवकरच 'शक्तिमान' मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

परंतु लहान मुलांसह अनेकांच्या पसंतीची झालेली ही मालिका अचानक का बंद पडली हा प्रश्न त्यावेळी सर्वांना पडेलला. यावर वेगवेगळ्या चर्चा आजही रंगतात. मात्र, त्याचं खर कारण काय?  चला तर मग जाणून घेऊयात. शक्तीमान म्हटलं की अनेकांना डोळ्यासमोर बालपणीच्या आठवणी येतात. लहान मुलांमध्ये प्रचंड आकर्षण असलेल्या या शक्तीमान मालिकेची मध्यतरी दुसऱ्या सीझनची चर्चा होती. लवकरच त्याचा दुसरा सीझन येईल अशी शक्‍यता वर्तवली जात होती. शक्तीमान मालिकेत मुख्य भूमिका साकरलेले मुकेश खन्ना यांनी काही गुपिते उघड केली होती. लोकप्रिय असलेली ही मालिका बंद का करावी लागली होती, याचीही कारणे त्यांनी सांगितली होती. टीव्हीवर सुरु असलेली ही मालिका सुरुवातील प्राईम टाईममध्ये होती. शनिवारी सकाळी आणि मंगळवारी सायंकाळी ही मालिका टीव्हीवर प्रसारित होत होती. तरीही तिची लोकप्रियता वाढली होती. तेव्हा टीव्हीवर ही मालिका प्रसारित करण्यासाठी 3.80 हजार रुपये द्यावे लागत होते. तेव्हा मालिकेचा शो प्रायोजित होता. जाहीरीमधूनही त्यांना उत्पन्न मिळत होते. शक्तीमानची लोप्रियता पाहून रविवारीही मालिका सुरु करण्यात आली. रविवारी मुलांना सुट्टी असते त्यामुळे मालिकेसाठी ही चांगली गोष्ट होती.

मात्र, रविवारी मालिका सुरु झाल्यानंतर पुन्हा जास्त रक्कम मागण्यात आली. तरीही मालिका सुरु होती. त्यानंतर मालिकेचे 104 एपिसोड झाले. एपिसोड वाढल्याने फी दीड पट करण्यात आली होती, असे सांगितले जात आहे. म्हणजे तेव्हा 10.80 लाखापर्यंत रक्कम गेली होती. हे सर्व पाहून हे यशाचे वाईट परिणाम असल्याचे खन्ना यांनी सांगितले होते. अचानक तीन लाखाहून 10 लाख फी देणे हे न परवडणारे होते. त्यानंतर टीव्ही चॅनेलवाले आणखी रक्कम वाढवण्याच्या तयारीत होते, त्यामुळे लोकप्रिय झालेली मालिका बंद करण्याची वेळ आल्याचे सांगितले जात आहे. शक्तीमान मालिका बंद करण्याच्या वेगवेगळ्या कारणामध्ये मालिका पाहुन गच्चीवरुन मुले पडतात, असंही सांगितलं जात होतं. मात्र, खरं कारण नेमकं फी वाढवल्याचे की दुसरंच याची चर्चा आजही होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Asia Cup 2025 : सरकारच्या आदेशानुसार भारत-पाकिस्तान सामना, नियमांचं पालन करणार; अरुण धुमल यांचं स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

BDCC Bank : बीडीसीसी बँकेसमोर काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी; सचिवाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा BJP चा आरोप

Latest Marathi News Updates : नऊ दिवस बंद ठेवलेला करूळ घाटमार्ग आज दहाव्या दिवशी वाहतुकीस खुला

Maharashtra Politics: सहा जि.प.वर राहणार नारीशक्तीची सत्ता; अकोला, वाशीम, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदियाचा समावेश

Mumbai : अभिनेत्रीनं धावत्या लोकलमधून मारली उडी, डोक्याला अन् पाठीला गंभीर दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT