Actress Madhuri Pawar
Actress Madhuri Pawar  Instagram/ Madhuri Pawar
मनोरंजन

"रिअ‍ॅलिटी शोच्या विजेत्यांना नंतर कामच मिळत नाही"

स्वाती वेमूल

'अप्सरा आली' (Apsara Ali) या रिअ‍ॅलिटी शोची विजेती आणि टीव्ही अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या प्रवासाविषयी सांगितलं. माधुरीने 'देवमाणूस' या मालिकेत भूमिका साकारली. मात्र रिअ‍ॅलिटी शोनंतर काम मिळवणं किती कठीण होतं याविषयी ती व्यक्त झाली. माधुरीने एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. किंबहुना एमबीए करणारी ती तिच्या कुटुंबातील एकमेव मुलगी आहे. लहानपणापासूनच तिला अभ्यासासोबतच डान्स आणि अभिनयात खूप रस असल्याचं तिने सांगितलं.

'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत माधुरी म्हणाली, "महाराष्ट्राचा सुपर डान्सर या टीव्ही शोसाठी मी ऑडिशन दिलं होतं. हा अत्यंत लोकप्रिय शो होता. ऑडीशनमध्ये माझ्या नृत्यकौशल्याने परीक्षक प्रभावित झाले होते, मात्र माझ्याकडे सांगण्यासाठी कोणतीच कथा नसल्याने त्यांनी मला नाकारलं. सध्या शोचे निर्माते हे प्रतिभेपेक्षा अशा कथांमागे का धावतात तेच मला कळत नाही. हा सर्व टीआरपीचा खेळ आहे. पण अशा खेळामुळे अनेकांना चांगली संधी मिळत नाही."

माधुरीने 'अप्सरा आली' या रिअ‍ॅलिटी शोचं विजेतेपद पटकावलं. मात्र हा शो जिंकल्यानंतर खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली. "जेव्हा शो सुरू होता, तेव्हा मी २४ तास काम करत होते. अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली होती. मात्र शो संपल्यानंतर ते सर्व संपलं. रिअ‍ॅलिटी शो जिंकल्यानंतर प्रसिद्धी मिळते पण अशा विजेत्यांना नंतर काम मिळत नाही. ही गोष्ट मला खरी वाटते. हा माझा स्वत:चा अनुभव आहे. विजेत्याची क्रेझ ही फक्त दोन ते तीन महिनेच टिकते आणि त्यानंतर सर्वजण त्याला विसरतात. मराठी टीव्हीवरील अनेक असे विजेते आहेत, मात्र आता ते कुठे आहेत? काय करत आहेत? अनेकजण त्यापैकी कामाच्या शोधात असतील आणि हेच सध्याचं कटू सत्य आहे", अशी खंत तिने व्यक्त केली.

काम मिळत नसल्याने माधुरी नैराश्यात गेली होती. "मला काहीच काम मिळत नव्हतं. मी नैराश्यात गेले होते. सोशल मीडियावर मी अधिकाधिक व्हिडीओ बनवू लागले आणि नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी तेच माझ्या कामी आलं. रातोरात मी सोशल मीडिया स्टार झाले", असं तिने सांगितलं. माधुरीने 'देवमाणूस' या मालिकेत चंदाची भूमिका साकारली. ही भूमिका छोटी असली तरी त्यामुळे तिला चांगली प्रसिद्धी मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: 'डायल 108' अ‍ॅम्ब्युलन्स प्रोजेक्ट कंत्राट प्रकरण तापणार? हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस

Pat Cummins: कमिन्सनं सांगितलं कसं तुटलेलं त्याचं बोट... ऐकून हार्दिक अन् सूर्याही झाले शॉक; Video व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

Wedding Season : नोंदणी पद्धतीने विवाह करायचा आहे? मग, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

SCROLL FOR NEXT