rehana hai tere dil mein hindi movie sequel actress dia mirza actor r madhavan 
मनोरंजन

'रहना है तेरे दिल मे' च्या सिक्वेलमध्ये दिया- माधवन नाही, मग कोण? 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत ज्यांचा प्रभाव अद्याप प्रेक्षकांच्या मनावर आहे. त्यातही रोमँटिक चित्रपटांची संख्या मोठी आहे. रहना है तेरे दिल मैं हा चित्रपट देखील उदाहरण म्हणून सांगता येईल. या चित्रपटाची कथा, गाणी, संवाद, कलाकार अन त्यांचा अभिनय सर्वांच्या आवडीचा भाग होता. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचा सिक्वेल येणार अशी चर्चा होती. पहिल्या भागात प्रसिध्द अभिनेता आर माधवन आणि दिया मिर्झा यांनी काम केले होते. त्या दोघांनाही या चित्रपटांन स्टार बनवलं होतं. त्यांनाच दुस-या भागात एकत्र आणण्याचा प्रयत्न निर्माते आणि दिग्दर्शक यांचा होता. पण ते जमले नाही.

सोशल मीडियावर रहना है तेरे दिल मै च्या दुस-या भागाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे. त्यात कोण काम करणार असा प्रश्न चाहते विचारु लागले आहेत. त्याचे उत्तर सांगितल्यावर कदाचित तुम्हाला धक्का बसेल. मात्र ते खरे आहे अशी सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे त्या अभिनेत्रीला रहना है तेरे दिल मै च्या दुस-या भागासाठी साईन करण्यात आले आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी पूर्वीचे कलाकार यांना पुन्हा एकत्र आणण्याचे प्रयत्न केले होते. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. तसे झाले असते आर माधवन आणि दियाची हिट जोडी पडद्यावर पाहायला मिळाली असती.

आर माधवन आणि दिया बरोबर सैफ अली खानची या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका होती. हा चित्रपट यशस्वी होण्यामागील एक महत्वाचे कारण म्हणजे त्यातील गाणी कमालीची लोकप्रिय झाली होती. बॉक्स ऑफिसवर त्याला थोडेफार यशही मिळाले होते. RHTDM अशी त्या सिनेमाची ओळख झाली होती. येत्या काही दिवसांत या सिनेमाचा दुसरा भाग  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आर माधवन आणि दियाला एक वेगळी ओळख चित्रपटामुळे मिळाली होती. मात्र एक वेगळी बाब म्हणजे या चित्रपटानंतर त्यांनी एकही चित्रपट एकत्रितपणे केला नाही.

आता रहना है तेरे दिलच्या सिक्वेलमध्ये सध्याची आघाडीची अभिनेत्री क्रिती सेनन काम करणार आहे. ती दिया मिर्झाच्या जागी दिसणार आहे. वासु भगनानी यांनी पहिल्या भागाची निर्मिती केली होती. आता त्यांचा मुलगा जॅकी भगनानी दुसरा भाग तयार करणार आहे. खरं तर दुस-या भागासाठीही आर माधवन, दिया आणि सैफ यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न जॅकीचा होता. मात्र तो काही यशस्वी झाला नाही. चित्रपटाची कथाही वीस वर्षानंतर अशी पडद्यावर साकारली जाणार होती. मात्र तो योग काही जुळून आला नसल्यानं त्यात वेगळे कलाकार घ्यावे लागले आहेत. 
 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagaradhyaksha Results 2025 : राज्यात भाजपा १ नंबरचा पक्ष, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार विजयी? वाचा विभागनिहाय यादी...

IND vs PAK U19, Final: वैभव सूर्यवंशी - आयुष म्हात्रे पाकिस्तानी खेळाडूंना भिडले; विकेट्सनंतर घडली चकमक; Video Viral

Latur to Badlapur: लातूर ते मुंबई प्रवास फक्त ५.५ तासांत होणार! कोकण–मराठवाड्याला थेट जोडणारा हाय-स्पीड हायवे मंजूर, पाहा मार्ग

Devendra Fadnavis: नगरपरिषद निवडणुकांत भाजप नंबर वन! देवेंद्र फडणवीसांनी विजयाचं श्रेय कुणाला दिलं? म्हणाले...

हृदयद्रावक घटना! 'टिप्परच्या धडकेत पिता-पुत्राचा जागीच मृत्यू'; आजारी मुलाला शाळेतून आणताना गुरसाळेत काळाचा घाला..

SCROLL FOR NEXT