Rekha  Esakal
मनोरंजन

Rekha प्रत्येक सोहळ्यात कांजीवरम साडीच का नेसते?, अभिनेत्रीचं सीक्रेट ऐकून म्हणाल,'शेवटी प्रेम..'

रेखा नेहमी कांजीवरमच साडी का नेसते.. हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर तिनं याचं सीक्रेट शेअर केलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय..नक्की पहा.

प्रणाली मोरे

Rekha Secrets: बॉलीवूडमध्ये अनेक सौंदर्यवती आल्या अन् गेल्या पण रेखा नावाच्या सौंदर्यानं भारलेल्या राज्याच्या हुकमतीला कोणीही धक्का लावू शकलं नाही. ती कालही तितकीच रेखीव होती..ती आजही तेवढीच मोहक आहे..

रेखा म्हटलं की सौंदर्यातलं परफेक्शन काय असतं याचं ज्वलंत उदाहरण. देवानं नाकी डोळी नीटस बनवलंय म्हणून कसंही रहा आपण सुंदरच आहोत असं मानणाऱ्यातली ती नक्कीच नाही. ती केवळ आपल्या दिसण्यानं नाही तर आपल्या पेहरावानं,आपल्या बोलण्यानं,आपल्या अदांनी अनेकांची मनं काबिज करताना दिसते.

सगळ्यांच्या नजरा रेखाला पाहिल्यावर तिच्यावरच खिळलेल्या असतात. तिच्या साड्यांचे देखील अनेकांना अप्रूप. रोज ही इतक्या ट्रेडिशनल कांजीवरम साड्या आणते कुठून आणि साड्याच का नेसते? आता या अनेकांच्या प्रश्नाला उत्तर देताना रेखानं आपल्या आयुष्यातील एक भावूक सीक्रेट ओपन केलंय. (Rekha this is the reason why she always wearing kanjeevaram saree )

रेखा म्हणाली, ''मला मी जिथे जाईल तिथे हा प्रश्न कायम विचारला जातो की, तू नेहमीच साडी आणि त्यातही कांजीवरमच साडी का नेसतेस?''

रेखा एका पुरस्कार सोहळ्यात आपल्या आयुष्याचं एक मोठं सीक्रेट शेअर करायला जात होती.

ती म्हणाली,''हे सीक्रेट आज मी इथे शेअर करतेच कारण तसं ते फार खाजगी आहे अशातला भाग नाही, त्यामुळे सांगूनच टाकते. स्टायलिस्ट रहाणं म्हणजे फक्त हटके काहीतरी घालणं असं नसतं''.

''आपल्या ट्रेडिशनल गोष्टीशीही आपल्याला स्टायलिस्ट दाखवू शकतात. कारण शेवटी ही एक भावना आहे. मी साड्या नेसते कारण ही माझी ट्रेडिशन आहे..माझी परंपरा आहे..आणि या मुळाशी मी आजही जोडलेले आहे''.

''साडी मला माझ्या आईची,तिच्या उबदार मायेची आठवण करून देते''.

''आणि कांजिवरम साडीच का नेसते असं विचाराल तर मला वाटतं यात खूप सारं प्रेम,सुरक्षेची भावना आणि खूप साऱ्या प्रेमाची ऊब दडलेली आहे..जी मला माझ्या आईकडून मिळतेय असं सारखं वाटत राहतं. आणि यासाठी मी माझ्या अम्माचे(आईचे) आभार मानते''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT