remo 
मनोरंजन

रेमो डिसूजाला मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, सोशल मिडियावर पोस्ट करत म्हणाला...

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजाला मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. रेमो पत्नी लिजेलसोबत शुक्रवारी दुपारीच त्याच्या घरी पोहोचला. गेल्या शुक्रवारी रेमोला अचानक हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रेमोची हार्ट सर्जरी झाली आहे. सर्जरी करुन त्याच्या हृदयातील ब्लॉकेजेस काढण्यात आले आहेत.   

कोरिग्राफर रेमो डिसूजाला सर्जरीनंतर आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याची पत्नी लिजेल या दरम्यान त्याची देखभाल करत होती. रेमोच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला आयसीयूमधून दुस-या रुममध्ये हलवण्यात आलं होतं. रेमोच्या अचानक तब्येत बिघडल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण होतं. सोशल मिडियावर अनेकजण त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत होते. त्यामुळे हॉस्पिटलमधून घरी परतल्यावर त्याने सोशल मिडियावर चाहत्यांसाठी एक खास पोस्ट केली आहे. 

रेमोने इंस्टाग्रामवर पोस्ट करत त्याच्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिलंय, तुम्हा सगळ्यांच प्रेम, प्रार्थना आणि आशिर्वादाने मी परत आलो आहे. सुंदर स्वागतासाठी गैबरियाल डिसूजा, एडनाइस आणि एडी रॉकवूड यांचे आभार आणि माझ्या सगळ्या मित्रांचे धन्यवाद. 

याआधी 'एबीसीडी २' आणि 'स्ट्रीट डान्सर ३ डी' सिनेमामध्ये रेमोसोबत काम करणा-या अभिनेता, डान्सर राघव जुयालने इंस्टाग्रामवर त्याच्या तब्येतीबाबच माहिती दिली होती. तसंच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल मिडियावर रेमोच्या तब्येतीसाठी प्रार्थना केली होती. रेमोला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी श्रद्धा कपूर, पुनीत पाठक, धर्मेश यांसारखे सेलिब्रिटी देखील गेले होते.   

remo d souza discharged from hospital admitted after heart attack  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'छत्रपती शिवाजी महाराज लिंगायत समाजाचे, कन्नड वंशाचे होते'; कन्नड साहित्यिकाच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

Prataprao Pawar: कृषी क्षेत्रात ‘एआय’चा नवा अध्याय; प्रतापराव पवार, ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात ‘एआय-एमएल-आयओटी’ सामंजस्य करार

Sakal Premier League: आजपासून रंगणार ‘सकाळ प्रीमिअर लीग’चा थरार; विजेत्या संघाला दोन लाखांचा पुरस्कार, विजेतेपदासाठी झुंजणार ३२ संघ

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; कंटेनर चालकासह दोघांचा जागीच मृत्यू, चार गंभीर जखमी

India Women Kabaddi: भारत अंतिम फेरीत दाखल; महिला विश्वकरंडक कबड्डी, इराणवर मात

SCROLL FOR NEXT