renuka shahane on kangana 
मनोरंजन

'सुशांतच्या मृत्युचा मुद्दाच भटकला', कंगनावर भडकल्या रेणुका शहाणे

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई-   सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अनेक सेलिब्रिटी या प्रकरणावर स्वतःचं मत मांडत आहेत. अभिनेत्री रेणुका शहाणे देखील या मुद्द्यावर सुरुवातीपासूनंच त्यांच मत व्यक्त करत आहेत. मात्र त्यांना आता असं वाटू लागलं आहे की आता जे काही सुरु आहे आणि जे काही वादविवाद होतायेत त्याचा सुशांतच्या केसशी काहीच संबंध नाहीये. या प्रकरणावर रेणुका यांनी कंगना रनौतवर देखील टिका केली आहे.

एका न्यूज पोर्टलसोबत बोलताना रेणुका यांनी सांगितलं की 'सुशांत केस आता मागे राहिली आहे. हे प्रकरण तेव्हाच मागे पडलं जेव्हा कंगनाने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला टारगेट करण्यास सुरुवात केली आणि मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केली. त्या म्हणाल्या की हे सगळे मुद्दे सुशांतच्या मृत्युशी संबंधित नाहीयेत. रेणुका असं देखील म्हणाल्या की सुशांतच्या प्रकरणावर कंगनाची पहिली रिऍक्शन हिच होती की हे केवळ घराणेशाहीमुळे झालंय.'

रेणुका शहाणे यांनी कंगनाने उर्मिलावर केलेल्या आरोपांचा देखील कडक शब्दात निषेध केला. कंगनाने उर्मिला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटलं होतं. यावर रेणुका यांनी कंगनाने सभ्यतेची हद्द पार केल्याचं म्हटलंय. तसंच या सगळ्या बेकार गोष्टी आहेत ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर हे सगळं बोलत आहे. रेणुका म्हणाल्या की त्यांना कंगनाकडून कोणत्याच प्रकारच्या संवेदनशीलतेची अपेक्षा देखील नाहीये.   

renuka shahane slams kangana ranaut on comment about urmila matondkar and sushant case  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत भारतातील पहिले मॅन्ग्रोव्ह पार्क तयार! पर्यटकांसाठी कधी आणि कुठे खुले होणार? जाणून घ्या खासियत...

Crime: धक्कादायक! रुग्णालयात कामाचा ताण वाढला; १० रुग्णांना संपवलं, तर अन्य २७ जणांना... नर्सचा भलताच कांड वाचून व्हाल थक्क

'ब्लाऊजमध्ये हात घातला आणि...' बसमध्ये एका व्यक्तीची महिलेसोबत घाणेरडे स्पर्श, व्हिडिओ बनवत अद्दल घडवली

Marathi Movie : डबल नाही तर तिहेरी भूमिका ! असंभव सिनेमासाठी सचित पाटीलचा नवा प्रयोग

Rahul Gandhi targets PM Modi : ''मोदीजी, तुमचे मौन बरेच काही सांगते, तुम्ही यासाठी गप्प आहात, कारण...''

SCROLL FOR NEXT