rhea chakraborty on sushant 
मनोरंजन

रिया चक्रवर्तीने सुशांतसोबत भांडण झाल्याचं केलं कबुल? लग्नाबाबतही दिली अशी कबुली...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- सुशांतची आत्महत्या अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. त्याच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट होत नसल्याने चाहत्यांमध्येही तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय. हे कारण शोधून काढण्यासाठी पोलीस एकामागोमाग एक अशा जवळच्या काही लोकांचा जबाब नोंदवून घेत आहेत. सुशांतच्या कुटुंबाचा जबाब सर्वात आधी नोंदवून झाला आहे. नुकतंच सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये बोलवून जवळपास ११ तास तिची चौकशी करण्यात आली. रियाच्या चौकशीमधील काही महत्वाचे मुद्दे आता समोर येत आहेत.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात रियाला चौकशीसाठी बोलवलं गेलं होतं. ती सकाळी ११.३० वाजता पोहचली  आणि रात्री १०.१५ वाजता पोलीस स्टेशनमधून निघाली. मुंबई पोलिसांशी संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाने तिच्या आणि सुशांतच्या नात्याविषयी, एक वर्षातले त्यांचे संबंध, सिनेइंडस्ट्रीतील सुशांतचे लोकांशी असलेले संबंध, रियाचं सुशांतसोबत घरात शिफ्ट होणं, दोघांच्या लग्नासंबंधित गोष्टींचा जबाब नोंदवला गेला. 

रिया आणि सुशांत अनेक काळापासून एकमेकांना डेट करत होते. सुत्रांच्या माहितीनुसार, दोघेही यावर्षी लग्न करणार होते. पोलिसांशी संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने दोघंही या वर्षाच्या शेवटपर्यंत लग्न करणार असल्याचं  जबाबात कबुल केलं. पोलिसांनी रिया आणि सुशांतचे कॉल रेकॉर्ड्स देखील तपासले. रियाने दोघंही एकत्र पॉपर्टी खरेदी करणार होते ही गोष्टीही पोलिसांना सांगितली.

रिया आणि सुशांत एकमेकांसोबत राहत होते. सुत्रांच्या माहितीनुसार, रियाने चौकशीमध्ये सांगितलं की सुशांच्या आत्महत्येच्या काही दिवस आधी त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. असं म्हटलं जातंय की रियाने तिच्या जबाबात असंही म्हटलं की तिचं आणि सुशांतचं भांडण झालं होतं ज्यानंतर ती ती त्या घरातून निघून गेली. अशाही चर्चा आहेत की सुशांतने आत्महत्येच्या एक दिवस आधी म्हणजेच शनिवारी रात्री रियाला फोन केला होता आणि रियाने तो फोन उचचला नाही.  

rhea chakraborty accepted marriage plan with sushant singh rajput in police investigation says report  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT