jaya saha summon by ed 
मनोरंजन

रिया ड्रग चॅट: ईडीने जया साहाला पाठवले समन्स, नारकोटिक्स ब्युरोदेखील ऍक्शन मोडमध्ये

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत सिंह राजपूत केसमध्ये रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअप चॅटमधून मोठा खुलासा झाला आहे. या चॅटमुळे खरंतर या प्रकरणाने नवीन वळण घेतलं आहे. रिया चक्रवर्तीने डिलीट केलेले व्हॉट्सअप चॅट ईडीने रीट्रीव केले आहेत. बुधवारी या प्रकरणात ईडीने रिया चक्रवर्तीची टॅलेंट मॅनेजर जया साहाला चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. तर यामुळे नारकोटीक्स ब्युरोचे अधिकारी देखील मिटींग घेणार आहेत. या मिटिंगमध्ये सुशांत प्रकणात ड्रग एँगलने चर्चा होईल आणि पुढची कारवाई ठरवली जाईल.

रियाच्या या व्हॉट्सअप चॅटमधून असा संशय बळावतोय की रिया चक्रवर्ती सुशांतला ड्रग्स देत होती. आता सुशांतला याविषयीची माहिती होती की नाही हा तपासाचा विषय आहे. मात्र  रिया ड्रग चॅट प्रकरणाने आता तर नारकोटिक्स ब्यरोला देखील यात आणलं गेलं आहे. रियाच्या या चॅट्समुळे निश्चितच प्रकरणाची दिशा बदलली आहे. या खुलास्यानंतर सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह किर्तीने देखील ट्विट करत सीबीआयकडे लगेचच ऍक्शन घेण्याची मागणी केली आहे. तिने ट्विट करत म्हटलं आहे की, 'हे एक गुन्हेगारी प्रकरण आहे. सीबीआयने त्वरित यावर कारवाई केली पाहिजे.'

एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या हाती देखील रियाचे हे ड्र्ग संबंधित चॅट लागले आहेत. यामध्ये रिया एका कथित ड्रग डिलरकडून बेकायदेशीर ड्रग्स जसं MDMA , हशीश आणि मैरुआना सारख्या ड्रग्सच्या वापराबाबत चर्चा करत आहे. रियाचे काही मेसेजेस समोर आले आहेत ज्यामध्ये तिने नोव्हेंबर २०१९ मध्ये तिची टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि कथित ड्रग डिलर गौरव आर्या यांच्यासोबत सुशांतला ड्रेग देण्याबाबत चर्चा केली आहे.     

rhea drug chat talent manager jaya saha summoned by ed ncb to discuss drug angle  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT