Rhea Chakraborty  esakal
मनोरंजन

Rhea Chakraborty On Trolling: सुशांतने आत्महत्या का केली? तीन वर्षांनंतर रियानं केला खुलासा

Vaishali Patil

Rhea Chakraborty on mental health:  दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न मागे राहिले आहे. आजही सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत. त्यातच या आत्महत्याप्रकरणात जास्त चर्चेत आली ती सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली होती.

तिला अटकही करण्यात आली होती. त्यानतंर तिच्या नावाची सोशल मीडियावर खुप चर्चा झाली. नेटकऱ्यांनी तिच्यावर कडाडून टीका केली होती. आजही रियाला यामुळे ट्रोलिंगला सामोरं जावं लागते.

रिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत असते. आता रियानं सुशांत प्रकरणावर आणि तिच्या आयुष्याबाबत काही खुलासे केले आहेत.

रियाने 'इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2023' ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेक प्रश्नाची उत्तर दिली. यावेळी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ती म्हणाली की, जेव्हा ती लोकांच्या चेहऱ्याकडे पाहते तेव्हा असं वाटतं की काही लोक तिच्याकडे अशा नजरेने पाहत आहेत जसे जणू तिने काहीतरी केले आहे.

रिया म्हणते, 'मी लोकांचे चेहरे वाचू शकते. 'चुडेल ' हे नाव मला आवडले आणि मला त्याने काही फरक पडला नाही. सुशांत सिंगच्या आत्महत्येबाबत बोलतांना रिया म्हणाली की, "त्याने असं का केलं हे मला माहीत नाही. पण तो कोणत्या परिस्थितीतून गेला आहे हे मला माहीत आहे."

रियाच्या पूर्वीच्या आयुष्यात आणि आताच्या आयुष्यात काय फरक झाला आहे याबाबतही तिने सांगितलं आहे. रिया म्हणते की, पूर्वी वयाच्या 31 व्या वर्षी तिला 81 वर्षांच्या वृद्ध महिलेसारखे वाटायचे. पण आता थेरपीची मदत घेऊन ती या सर्वांतून पुढे आली आहे.

तिला आता काही फरक पडत नाही. कठीण काळात तुम्ही देवदास होऊ शकता किंवा थेरपीची मदत घेऊन पुढे जाऊ शकता. अन् मी थेरपीची मदत घेतली. असं रिया सांगते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२० लाखांचं पॅकेज, वर्क फ्रॉम; IT इंजिनिअरने आईला का संपवलं?

Pune Nashik Highway: पिंपळवंडीत तरुणाला मारहाण; कुकडी नदीच्या पुलावरून पडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

SCROLL FOR NEXT