rhea chakraborty 
मनोरंजन

रिया चक्रवर्तीने शेअर केली तिच्याकडे असलेली सुशांतची एकमेव शेवटची आठवण

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- रिया चक्रवर्तीच्या विरोधात सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की रियाने त्यांचा मुलगा सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं आहे. सोबतंच रियावर सुशांतच्या पैश्यांची अफरातफर केल्याचा आरोपही लावला आहे. रियाची शुक्रवारी ईडीने जवळपास ८ तास चौकशी केली. रियाने यादरम्यान सांगितलं की तिने सुशांतच्या पैश्यांचा वापर केलेला नाही. आता रियाच्या माध्यमातून मिडियामध्ये एक सिपरचा फोटो रिलीज केला गेला आहे ज्यावर छिछोरे असं लिहिलं आहे.  

सुशांतच्या कुटुंबाने रियावर आरोप केले आहेत की रिया सुशांतच्या पैश्यांचा वापर करत होती. तर सुशांतच्या स्टाफनेही हे सांगितलं आहे की सुशांतचे सगळे पैसे रियाच खर्च करायची. या प्रकरणामुळे मनी लॉन्ड्रिंगच्या दिशेने देखील तपास सुरु आहे. त्यामुळे ईडीने कठोर पद्धतीने रियाची चौकशी केली. मिडिया रिपोर्ट्सनुसार रियाने एका बॉटलचा फोटो शेअर केला ज्यावर छिछोरे असं लिहिलेलं होतं. तिचं म्हणणं आहे की जर तिच्याकडे सुशांतची कोणती गोष्ट आहे ती फक्त हीच आहे.

रिपोर्ट्सनुसार रियाचे वकिल मानशिंदे यांनी सुशांतच्या अक्षरात लिहिलेली एक नोट देखील दाखवली. या नोटमध्ये  सुशांतने रिया आणि तिचं कुटुंब त्याच्या आयुष्यात आल्याने देवाचे आभार मानले आहेत असं लिहिलेलं दिसून येतंय. 

सुशांतच्या स्टाफचं म्हणणं आहे की रिया जे काही ऑनलाईन शॉपिंग करायची त्याचं पेमेंट सुशांतच्या कार्डने व्हायचं. मिडिया रिपोर्ट्समध्ये सुशांतचा हा व्यवहार देखील दिसून आला आहे. यामध्ये रियाचा भाऊ शौविकच्या अकाऊंटमध्ये सुशांतच्या अकाऊंटमधून पैसै पाठवले गेले आहेत. असं देखील म्हटलं जातंय की सुशांतला त्याच्या अकाऊंट बंद करायचं होतं बँककडून ती विनंती परत घेतली गेली.     

rhea chakraborty shares sushants chhichhore sipper pictures claimed she has only this property  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT