rhea chakraborty 
मनोरंजन

होळीच्या निमित्ताने रिया चक्रवर्तीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

स्वाती वेमूल

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. धुळवडीच्या दिवशी रियाने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या पोस्टसोबतच तिने #LOVEISPOWER (प्रेम ही शक्ती आहे) हा हॅशटॅगसुद्धा आहे. सुशांतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रियाला अंमलीपदार्थविरोधी पथकाने अटक केली होती. त्यानंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली. तेव्हापासून रिया सोशल मीडियापासून दुरावली होती. जागतिक महिला दिनानिमित्त पोस्ट केल्यानंतर तिने आज पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. रॉबर फुलघम या लेखकाची ओळ तिने पोस्ट केली आहे. 

काय आहे रियाची पोस्ट?
'प्रेम हे एक असं कापड आहे, ज्याचा रंग कधीच उडत नाही. ते कापड संकटांच्या आणि दु:खाच्या पाण्यात कितीही वेळा धुतलं तरी त्याचा रंग फिका पडत नाही', या रॉबर फुलघम यांच्या ओळी तिने पोस्ट केल्या आहेत. यासोबतच तिने तिचा आणि तिच्यासोबत आणखी एका महिलेचा फोटो पोस्ट केला आहे. रियाच्या या पोस्टवरील कमेंट्समध्ये अनेकांनी सुशांतविषयी तिला प्रश्न विचारले आहेत. 

१४ जून २०२० रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी आत्महत्या केली. यानंतर झालेल्या तपासात समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शननुसार एनसीबीने तपास सुरू केला. या तपासादरम्यान रिया, तिचा भाऊ शौविक, सुशांतच्या कर्मचारी वर्गातील काही आणि बॉलिवूडमधील इतर काही व्यक्तींमध्ये झालेल्या व्हॉट्स अॅप चॅटच्या आधारे एनसीबीने तपास सुरू केला. 

आगामी 'चेहरे' चित्रपटात रियाची भूमिका
ड्रग्ज प्रकरणानंतर रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. आगामी 'चेहरे' या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. यामध्ये इमरान हाश्मी, अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका आहेत. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT