Rhea Chakraborty  Esakal
मनोरंजन

Rhea Chakraborty: पब पार्टी छोडो जय श्रीराम बोलो ! नववर्षाच्या दिवशी रिया पोहोचली रामचरणी, व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Rhea Chakraborty Visits Temple In Dubai: 2024 वर्षाचा जल्लोष सर्वत्र सुरू झाला आहे. आपलं नववर्ष खास बनवण्यासाठी सर्वजण आपल्या परिने प्रयत्न करत होते. आता त्यातच नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये चित्रपट कलाकारही मग्न झाले होते.

एकीकडे सिद्धार्थ- कियारा, रणदीप-लिन अन् आलिया- रणबीर असे अनेक कपल नव वर्ष साजरा करत आहेत. तर आता बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने देखील नववर्षानिमित्त एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेयर केला आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रियाने असे काही केले आहे त्यामुळे ती चर्चेत आली आहे. एकीकडे बॉलिवूडचे इतर सेलिब्रिटी पार्टी करून आपले नवीन वर्ष साजरा करत असताना रियाने मंदिरात देव दर्शन घेऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली. नवीन वर्ष साजरं करण्यासाठी रिया दुबईला पोहोचली, जिथे तिने देवाचा जप करत 2024 चं स्वागत केले.

आता सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात रिया चक्रवर्ती देव दर्शनासाठी रांगेत उभी होती. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी तिचे कौतुक करत आहेत. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता.

अतिशय साध्या अवतारात रियाला पाहून नेटकरीही थक्क झाले होते. इतकंच नाही तर व्हीआयपी दर्शन सोडून ती रांगेत उभी राहिली होती. यावेळी तिने 'जय श्री राम'चा नारा लावला.

सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून अनेकांनी रियाचं कौतूक केलं आहे तर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनी तिच्यावर टीकाही केली आहे. त्यामुळे यावर्षीही तिला ट्रोलिंगला सामोरे जावं लागणार असल्याचं चित्र दिसत आहेत.

रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 'चेहरे' या चित्रपटात दिसली होती. यात ती अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्यासोबत दिसली होती. आता रिया तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT