Richa Chadha shared a hilarious parody video dedicated to her husband Ali Fazal on the occasion of Valentine’s day. Valentine 2023 Esakal
मनोरंजन

Valentine 2023: 'भला है बुरा..', रिचानं अलीची इज्जतच काढली! व्हिडिओ पाहून हसू नाय आवरणार

आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रिचा चड्ढाने पती अली फजलला खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या, जे पाहून तुम्हीही हसू आवरू शकणार नाही. 'व्हॅलेंटाईन अपना अपना' तिने म्हणत सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आज व्हॅलेंटाईन डे सगळीकडे मोठ्या आंनदात साजरा केला आहे. यानिमित्त मुहूर्तावर मराठी सेलिब्रिटींच्या प्रेमाला उधाण आलंय. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या जोडीदारासोबत खास रोमँटिक फोटो शेयर करत आपल्या जोडीदाराला विश केलं आहे. याला रिचा चढ्ढा ही अपवाद ठरली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा केवळ तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच नाही तर तिच्या विनोदी सवभावामुळे देखील ओळखली जाते. ती केवळ तिच्या विनोदी भुमिकेतूनच चाहत्यांच मनोरंजन करते त्याचबरोबर रिचा कॉमेडी व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर अपलोड करत असते. दरम्यान तिने आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तिचा पती अली फजलला एका खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या, जे पाहिल्यानंतर तुम्हीही हसू आवरू शकणार नाही.

रिचा आज लग्नानंतर ऋचा पती अली फजलसोबत पहिला व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे आणि हा प्रसंग खास बनवण्यासाठी अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती 80 च्या दशकातील 'नसीब अपना अपना' या चित्रपटातील 'भला है बुरा है किंवा जैस भी मेरा पती मेरा देवता है…' हे गाण्यावर अभिनय करत व्हिडिओ केला आहे.

यासोबतच रिचाने फराह नाजच्या हेअरस्टाइलचीही कॉपी केली आहे. हा व्हिडिओ शेअर करत रिचा चड्ढाने अली फजलला टॅग केले आणि लिहिले, 'हाय अली माय स्वीट व्हॅलेंटाइन.'

रिचा हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला आहे. यावर केवळ चाहतेच नाही तर सेलिब्रिटींनींही लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. रिचाचा हा व्हिडिओ पाहून अली फजललाही हसू आवरता आले नाही. याशिवाय चाहते आणि सेलेब्स रिचाच्या व्हिडिओवर हसणारे इमोजी पोस्ट करून तिचे कौतुक करत आहेत.

रिचा आणि अलीने गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर रोजी लग्न केले. याआधी दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. 'फुक्रे'च्या सेटवर दोघांची भेट झाली, त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.सध्या रिचा चड्ढा 'हिरामंडी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि अली फजल कामासाठी LA मध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT