Rihanna esakal
मनोरंजन

Rihanna: रिहाना 'Oops Moment' ची शिकार, अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये गाण्यासाठी 52 कोटी घेतले पण स्टेजवरच ड्रेस फाटला

Rihanna: नुकताच रिहानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये रिहानाचा ड्रेस फाटलेला दिसत आहे.

priyanka kulkarni

Rihanna: गुजरातमधील जामनगर येथे सध्या अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरु आहेत. 1 मार्चपासून सुरू झालेले हे प्री-वेडिंग फंक्शन्स 3 मार्चपर्यंत चालणार आहे. काल (2 मार्च) हॉलिवूड पॉप सिंगर रिहानाने (Rihanna) अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये परफॉर्म केलं. यावेळी स्टेजवर परफॉर्म करताना रिहाना Oops Moment ची शिकार झाली. नुकताच रिहानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये रिहानाचा ड्रेस फाटलेला दिसत आहे.

रिहाना Oops Moment ची शिकार

रिहानानं अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये 'वाइल्ड थिंग्स', 'पोर टी अप' आणि 'डायमंड्स' या गाण्यावर परफॉर्म केलं. रिहानाच्या परफॉर्मन्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशताच इव्हेंटमध्ये परफॉर्म करताना रिहानाचा ड्रेस फाटला. रिहाना स्टेजवर परफॉर्म करत होती तेव्हा तिच्या ड्रेसची शिलाई उसवली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये रिहानाचा ड्रेस फाटलेला दिसत आहे.

पाहा फोटो

Rihanna

परफॉर्म करण्यासाठी 52 कोटी मानधन घेतलं

काही दिवसांपूर्वी इंस्टंट बॉलिवूड नावाच्या इन्स्टग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यानुसार रिहानानं अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगसाठी तब्बल 52 कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे.

रिहानानं अनंत अंबानी आणि राधिका यांना दिल्या शुभेच्छा

अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग परफॉर्मन्सदरम्यान रिहाना म्हणाली, "आज इथे परफॉर्म करणे माझ्यासाठी खास आहे. याआधी मी कधीच भारतात आले नव्हते. अंबानी कुटुंबाचे आभार, त्यांच्यामुळे मी आज येथे आहे. अनंत आणि राधिका, मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वाद देवो. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. अभिनंदन."

बॉलिवूड कलाकारांनी लावली प्री-वेडिंग फंक्शनला हजेरी

अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, सैफ अली खान, जान्हवी कपूर, अजय देवगण, शाहरुख खान, आलिया भट्ट, करीना कपूर यांनी हजेरी लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT