Rinku RaJguru Google
मनोरंजन

अखेर आर्चीला परश्या सापडला!रिंकु राजगुरूच्या अफेअरची चर्चा रंगली

अभिनेत्रीच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे समोर आली बातमी

प्रणाली मोरे

अभिनेत्री रिंकू राजगुरूनं(Rinku Rajguru) केवळ मराठीत नाही तर हिंदीतही आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे. पण असं असलं तरी नागराज मंजुळे(Nagraj Manjule) दिग्दर्शित 'सैराट'(Sairat) सिनेमातील तिनं साकारलेली आर्ची मात्र आजही डोळ्यासमोरनं जात नाही. वयाच्या पंधराव्या वर्षात कोणत्याही ट्रेनिंगशिवाय तिनं साकारलेली भूमिका काही केल्या तिच्या चाहत्यांच्या मनातून पुसली जात नाही. म्हणूनच तर ती आजही आर्ची नावाने जास्त ओळखली जाते. तिच्यात असलेल्या सहज अभिनयगुणानं तिला यशाचे अनेक टप्पे पार पाडायला मदत केली. तिनं स्वतःमध्ये एका अभिनेत्रीसाठी आवश्यक असे सगळे बदल घडवून आणले. तेव्हाची रिंकू अन् आताची यात जमिन-आस्मानाचा फरक. आजपर्यंत आपण तिच्या सिनेमांच्या बातम्या वचाल्या असतील,तिच्या फिटनेस विषयी,तिच्यातील बदलाविषयी,तिच्या फॅशन आवडींविषयी वाचलं असेल पण आता बातमी आहे ती तिच्या अफेअरच्या चर्चांविषयी. काय घडलं असं नेमकं की रिंकू राजगुरू कोणाला तरी डेट करतेय अशा चर्चेला उधाण आलं. जाणूया सविस्तर.

रिंकू सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. ती अनेकदा आपल्या सिनेमांविषयी,फॅशन फोटोशूट विषयी पोस्ट करीत असते. तिचे चाहतेही तिच्या अशा पोस्टच्या प्रतिक्षेत असतातच. नुकतीच तिने एक पोस्ट केली आहे. ज्यात ती तिच्या डिनर डेटविषयी बोलत आहे. या डिनर डेटला तिच्यासोबत एक अभिनेताही दिसत आहे. दोघेही खूश दिसतायत आणि दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या डिनर डेटची पोस्ट शेअर केली आहे. कोण आहे तो अभिनेता?ज्याला रिंकू डेट करीत आहे.तर रिंकू सोबत डिनर डेटला गेला होता तिचा परश्या. हो,म्हणजेच सैराट सिनेमातला आकाश ठोसर. जो तिचा खूप चांगला मित्र आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघे डिनर डेटला गेले होते. तेव्हाचे फोटो दोघांनी पोस्ट केले आहेत. आकाशने पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे की,''खूप खाल्लं यार. उद्या जरा जास्त कार्डिओ करायला लागणार''. तसेच रिंकू राजगुरूने तिचा गाडीतला व्हिडीओ पोस्ट करत लिहिले आहे की,''लवकरच पुन्हा भेटू''.

Rinku Rajguru & Akash Thosar

ण त्यांचे डिनर डेटचे फोटो पाहून त्यांच्यातील अफेअरच्या चर्चांना मात्र उधाण आलं आहे. चाहत्यांनी खूप छान जोडी म्हणत कमेंट्स केल्या आहेत. पण या दोघांनी मात्र यावर शांत राहणं पसंत केलं आहे. रिंकू राजगुरू सैराटनंतर 'मेकअप','कागर' या मराठी सिनेमात तर '१००','अनपॉज्ड','२०० हल्ला हो' या वेबसिरीजमध्ये झळकली आहे. त्यानंतर आता ती 'छुमंतर' या मराठी सिनेमात दिसणार आहे. तर आकाश ठोसर 'एफ यू-फ्रेंडशीप अनलिमिटेड' या सिनेमात झळकला आहे. तसेच तो 'लस्ट स्टोरीज','१९६२ द वॉर इन दी हिल्स' या सीरिजमध्ये दिसला आहे. यानंतर आता तो 'घर','बंदूक बिर्यानी' या सिनेमातही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

Latest Marathi News Updates : पंजाबच्या पुरग्रस्तांना वणीकरांचा मदतीचा हात

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

SCROLL FOR NEXT