rinku sharma murder case ramayan serial actor arun govil reaction 
मनोरंजन

'रामाच्या देशात रामाचे नाव घेतल्यानं होणारी हत्या, मन हेलावलं'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - दिल्लीतील मंगोलपूरी भागातील बजरंग दलाच्या रिंकू शर्मा नावाच्या एका कार्यकर्त्याची निर्घुण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्या घटनेचा वेगवेगळ्या स्तरांतून निषेध नोंदविण्यात आला होता. घटनेचे तीव्र पडसादही उमटले होते. त्या घटनेनं प्रत्येकाला सुन्न केले होते. त्यावर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटकांच्या अनेक मान्यवरांनी आपली खंत व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी रिंकूची चाकूनं हत्या करण्यात आली होती.

या घटनेचा संदर्भ रिंकूच्या घरच्यांनी एका धार्मिक मुद्द्याशी जोडला हे. तर पोलिसांनी इतर दुस-या कारणांमुळे त्याचा मृत्यु झाल्याचे सांगितले आहे. रिंकू शर्माच्या हत्येनंतर तो ज्या भागात राहत होता तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेवर बॉलीवूड तसेच मनोरंजन क्षेत्रातील काही सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. टेलिव्हिजन चँनेलवरील प्रसिध्द मालिका रामायण त्यात रामाची भूमिका करणारे अभिनेते अरुण गोविलनं रिंकू शर्माच्या हत्येवर खंत व्यक्त केली आहे. त्यांनी त्यावर आपले दु:ख व्यक्त करताना सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी असे त्यांनी सांगितले असून पोलिसांनी तातडीनं तपास सुरु करावा असे म्हटले आहे.

सोशल मीडियावर अरुण गोविल सक्रिय असतात. समाजात घडणा-या वेगवेगळ्या गोष्टींवर ते प्रतिक्रिया देत असतात. त्यांनी लिहिले आहे की, रामाच्या देशात रामाचे नाव घेऊन रामाच्या कामात मदत करणा-या व्यक्तीची हत्या होत झाली. हे सारे मन हेलावून टाकणारे आहे. दिल्लीतील घटना निंदनीय आहे.. त्यात सहभाग असणा-यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. सोशल मीडियावर गोविल यांचे व्टिट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानंतर त्यांच्या फॉलोअर्सनंही त्या व्टिटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

10 फेब्रुवारीला दिल्लीतील मंगोलपुरी भागात राहणा-या रिंकू शर्माची हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर चाकूनं वार करण्यात आले होते. याप्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपींना अटकही केली आहे. रिंकूच्या घरच्यांनी सांगितले की, रिंकू 5 ऑगस्ट पासून राम मंदिराच्या निर्माणासाठी देणगी गोळा करत होता. त्यानिमित्तानं जी रॅली काढण्यात आली होती. त्यातही तो सहभागी झाला होता. काही जणांनी पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर वार केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांचे असे म्हणणे आहे की, त्याच्या जन्मदिनाच्या दिवशी एका हॉटेलमध्ये भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरुन त्याच्यावर वार करण्यात आल्याचे तपासात म्हटले आहे. या घटनेला आता राजकीय रंग येण्यास सुरुवात झाली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT