kantara 2  Esakal
मनोरंजन

kantara 2: क्यों हिला डाला ना! 'कंतारा 2' मध्ये दिसणार रजनीकांत.. ऋषभ शेट्टीनचं सांगून टाकलं...

सकाळ डिजिटल टीम

दाक्षिणात्य चित्रपटानं अख्या भारताला वेड लावलं. मग त्यात बाहूबली असो किंवा आरआरआर पण त्याचबरोबर एका चित्रपटानं तर सगळं वातावरणचं बदलून टाकलं. तो म्हणजे कन्नड दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीचा कांतारा. कारण यात कन्नड चित्रपट आणि अप्रतिम कथा असा संगम दिसला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटला सुपरहिट केला.

अगदी कमी बजेट मध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने भारतासह जगभरात बक्कळ कमाई केली. आता ऋषभ शेट्टी या चित्रपटाचा प्रिक्वल तयार करत आहे. चाहते या चित्रपटाबाबत अपडेट जाणुन घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळं आता चाहत्यासाठी एक मोठी गुडन्यूज ऋषभनंच दिली आहे. ती म्हणजे या चित्रपटात साउथ सुपरस्टार थलायवा रजनीकांत असल्याचं सकेंत ऋषभनं दिले आहे.

काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला 'कंतारा 2' मध्ये दिसू शकते अशा चर्चा होत्या मात्र ती या चित्रपटाचा भाग नसणार असं सांगण्यात आलं. आता ऋषभ शेट्टीनेच 'कंटारा 2' मधून एक स्पॉयलर दिला आहे. ऋषभ शेट्टीच्या कंटारा २ मध्ये सुपरस्टार रजनीकांत दिसणार असल्याचं बोलले जात आहे. या बातमीनंतर चाहते खुश झाले आहेत.

डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, ऋषभ शेट्टी नुकताच बेंगळुरूमध्ये कांताराच्या ब्लॉकबस्टर यशाबद्दल बोलत होता. त्याला कांतारा 2 बद्दल विचारलं असता त्याने सांगितले की, आम्ही स्क्रिप्टवर काम करत आहोत. सध्या स्क्रिप्टच्या पहिल्या भागाचं काम सुरू आहे. तसेच प्रीक्वलमध्ये प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज पाहायला मिळेल, असे आश्वासन ऋषभ शेट्टीने दिले. चित्रपटाचा जॉनरही वेगळा असेल.

kantara2

ऋषभ शेट्टीनं यासारख्या मोठ्या सरप्राईजचं नाव सांगितल्यावर त्याला सुपरस्टार रजनीकांत कांतारा 2 मध्ये दिसणार का?असा प्रश्नही विचारण्यात आला. मात्र यावेळी तो गप्प बसला.

कांतारा रिलीज झाला तेव्हा रजनीकांत यांनी ट्विटरवर चित्रपटाचं कौतुक केलं होतं. त्यांनी ऋषभचंही तोंड भरुन कौतुक केले होतं. काही दिवसांनंतर, ऋषभने खुलासा केला की तो रजनीकांत यांना त्याच्या चेन्नईच्या घरी भेटला होता जिथे त्यांनी चित्रपटाबद्दल चर्चा केली.त्यामुळं आता ही चर्चा रंगू लागली आहे की कांताराच्या दुसऱ्या भागात रजनीकांत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Bridge Collapse | 2022 पासून इशाऱ्यांकडे दुर्लक्ष, वारंवार सूचना दिल्यानंतर... गुजरात पूल कोसळण्यामागची धक्कादायक माहिती!

Latest Maharashtra News Updates : कल्याण-डोंबिवलीत डेंगू आणि मलेरियाचा धोका वाढतोय

Pashan-Sus Road : पाषाण-सूस रस्त्यावर धोकादायक वाहतूक, दुभाजकामुळे तीन किमीचा हेलपाटा; उपाययोजनांची वाहनचालकांची मागणी

World Maternal Health Day 2025: मातृ सुरक्षा दिन 10 जुलै ला का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्त्व

SIP Investment: फक्त 2,000 रुपयांची एसआयपी तुम्हाला बनवू शकते श्रीमंत; इतकी वर्ष करावी लागेल गुंतवणूक

SCROLL FOR NEXT