Rishabh Pant Accident esakal
मनोरंजन

Rishabh Pant Accident : ऋषभसाठी उर्वशीचे देव पाण्यात! 'मी आता...'

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत याचा अपघात झाल्यानंतर त्याच्या लाखो चाहत्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rishabh Pant Accident : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत याचा अपघात झाल्यानंतर त्याच्या लाखो चाहत्यांचा जीव टांगणीला लागला आहे. भारतीय क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. यासगळ्यात अनेक सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात ऋषभची मैत्रीण उर्वशीच्या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

उत्तराखंडवरुन दिल्लीकडे प्रवास करत असताना ऋषभच्या कारला अपघात झाला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चाहत्यांनी आपल्या लाडक्या ऋषभसाठी देवाचा धावा सुरु केला आहे. तो लवकरात लवकर या संकटातून बाहेर यावा म्हणून देवाला साकडेही घातले आहे.

Also Read - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभची मर्सिडिज दिल्ली - डेहराडून महामार्गावर एका डिव्हायरडला धडकली. यासगळ्यात उर्वशीची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. यावेळी चाहत्यांना आठवण आली ती उर्वशीची. तिनं यासगळ्या अपघातावर काय प्रतिक्रिया दिली आहे याची अनेकांना उत्सुकता होती. उर्वशीच्या इंस्टा अकाउंटवर नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. त्यात एकानं तर तू अजुनही कोणतीही प्रतिक्रिया का दिलेली नाही असा सवाल तिला विचारला आहे.

उर्वशीनं काही वेळेपूर्वी एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये ती वेगळ्याच रुपात दिसते आहे. यावेळी तिनं लिहिलं आहे की...प्रार्थना... याप्रसंगी नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याकडे न पाहता दिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आपण कसे वागतो आहोत यावेळी काय महत्वाचे आहे याचा साधा विचारही उर्वशी करु शकत नाही का...अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला सुनावले आहे.

उर्वशीनं आपल्या त्या पोस्टमध्ये एका वेगळ्या लूकमधील फोटो शेयर केला असून त्याला प्रेयर अशी कॅप्शन दिली आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी तिनं ऋषभसाठी खास पोस्ट शेयर केल्याचा अंदाज लावला आहे. ऋषभच्या त्या घटनेनंतर काही वेळेतच तिनं ही पोस्ट शेयर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT