Urvashi Rautela Sakal
मनोरंजन

Rishabh Pant : उर्वशी रिषभला भेटायला रुग्णालयात? 'त्या' फोटोने चर्चांना उधाण

रिषभचा अपघात झाल्यावर तिने प्रार्थना करत असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगत फोटो शेअर केला होता.

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेटर रिषभ पंत याचा नुकताच अपघात झाला आहे. त्याच्यावर सध्या मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच विषयी आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या एका फोटोची चर्चा सुरू झाली आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि रिषभ पंत यांच्या अफेअर्सच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. त्यातच आता उर्वशीच्या या फोटोमुळे या चर्चांमध्ये भर पडली आहे.

Urvashi Rautela

उर्वशीने इन्स्टाग्रामवर स्टोरी अपलोड केली आहे. या स्टोरीमध्ये तिने रिषभवर उपचार सुरू असलेल्या कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयाच्या बाहेरचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता उर्वशी रिषभला भेटायला रुग्णालयात गेली की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

रिषभ पंतचा उत्तराखंडजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये त्याच्या गाडीने पेट घेतला, मात्र वेळेवर रिषभ बाहेर आल्याने त्याचा जीव वाचला. त्याच्या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर काही वेळातच उर्वशीने एक पोस्ट केली होती.

उर्वशीने पांढरे कपडे आणि डायमंड ज्वेलरीमधला एक फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने Praying (प्रार्थना करत आहे), अशी एक ओळही टाकली आहे. त्यावरुन पुन्हा एकदा या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT