Rishabh Pant car accident Urvashi Rautela  esakal
मनोरंजन

Rishabh Pant car accident : 'वहिनी ऋषभला भेटायला निघाल्या की काय?' उर्वशी थेट विमानतळावर

ऋषभ पंतच्या प्रकृतीत थोड्याफार फरकानं सुधारणा होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rishabh Pant car accident Urvashi Rautela bollywood actress : ऋषभ पंतच्या प्रकृतीत थोड्याफार फरकानं सुधारणा होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दिल्ली - डेहराडून हाय वे वर त्याच्या कारला मोठा अपघात झाला होता. यावेळी त्याला गंभीर दुखापत झाली होती. ऋषभला तातडीनं दिल्लीतील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

काही वेळेपूर्वी बॉलीवूडचे दोन दिग्गज कलाकार अनुपम खेर आणि अनिल कपूर यांनी ऋषभची भेट घेतली असून त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. यासगळ्यात चर्चा रंगली आहे ती ऋषभच्या मैत्रीणीची ती म्हणजे उर्वशी रौतेलाची. उर्वशीनं ऋषभला अपात झाल्याचे कळताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली होती. त्यावेळी तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले होते.

Also Read - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

उर्वशीनं थोड्यावेळापूर्वी एक ट्विट करुन ऋषभ आणि त्याच्या कुटूंबियांसाठी प्रार्थना केली. तिचं ते ट्विट नेटकऱ्यांच्या नजरेत आले आहे. त्यामुळे तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसून येतो आहे. यासगळ्यात उर्वशी ही दुसऱ्याच एका कारणामुळे देखील चर्चेत आली आहे. ते म्हणजे उर्वशीला विमानतळावर स्पॉट केले गेले आहे. याचा अर्थ ती ऋषभला भेटायला निघाली आहे. असा अंदाज तिच्या चाहत्यांनी लावला आहे.

उर्वशीच्या व्हायरल झालेल्या त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकानं म्हटलं आहे की, वहिनी कुठं ऋषभला भेटायला निघाल्या की काय....दुसऱ्यानं आता तुम्ही जाणार म्हणजे ऋषभ लगेच बरा होणार अशी मिश्किल टिप्पणी देखील केली आहे. उर्वशीचा तो विमानतळावरील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: भारताच्या फिरकी जाळ्यात अडकले ऑस्ट्रेलियन्स! चौथा T20I जिंकून टीम इंडियाची मालिकेत आघाडी

Ausa News : अतिवृष्टीत सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांच्या लेकींचा उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाहो

Dy Chief Minister Attacked: धक्कादायक! आधी निदर्शने, नंतर उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, बिहारमध्ये नेमकं काय घडलं?

Solapur Crime : बार्शीत दारु पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात दारुच्या बाटल्या फोडल्या. दोघांविरोधात गुन्हा दाखल!

IND A vs SA A, Test: रिषभ पंतसमोर 'तडगा' स्पर्धक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पठ्ठ्याचं झुंजार शतक, भारताच्या कसोटी संघासाठी ठोकला दावा

SCROLL FOR NEXT