मनोरंजन

Riteish Deshmukh And Genelia Deshmukh: महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीच्या सुखी संसाराची 12 वर्षे; देशमुखांच्या सुनेनं शेअर केला मजेशीर व्हिडीओ

Riteish Deshmukh And Genelia Deshmukh: लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रितेश आणि जिनिलिया यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केल्या आहेत. या दोघांच्या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Riteish Deshmukh And Genelia Deshmukh: अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) या महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीच्या सुखी संसाराला आज 12 वर्ष झाली आहेत. जिनिलिया आणि रितेश या दोघांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रितेश आणि जिनिलिया यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केल्या आहेत. या दोघांच्या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

जिनिलियानं शेअर केला मजेशीर व्हिडीओ

जिनिलियानं सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जिनिलिया हा रितेशच्या पोटात पंच मारताना दिसत आहे. जिनिलियानं शेअर केलेल्या मजेशीर व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. जिनिलियानं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, "माझा प्रिय नवरा, ही रील आमची आहे. मला, तुझ्याकडून सतत काहीतरी हवं असतं आणि तू त्याच्या अगदी उलट वागत असतो. पण माझ्या मते हे प्रेम आहे . नेहमी काहीतरी खास करत राहू, कधीही हार न मानता,नेहमी एकमेकांसोबत राहू. लव्ह यू, रितेश. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा"

रितेशची खास पोस्ट

रितेशनं त्याच्या आणि जिनिलियाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये जिनिलिया आणि रितेशचा रोमँटिक अंदाज बघायला मिळतो. या फोटोला रितेशनं कॅप्शन दिलं, "जेव्हा तुमचे संपूर्ण जग तुमच्या जवळ असते… और जीने को क्या चाहिये…बायको, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! तुझ्या सोबतचा प्रत्येक दिवस हा खास आहे !!!"

रितेश आणि जिनिलिया यांनी 2012 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना रियान आणि राहिल ही दोन मुलं आहेत. 2022 मध्ये रितेश आणि जिनिलिया यांचा वेड हा चित्रपट रिलीज झाला. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mango Market Rate : फळांचा राजा हापूस आंबा मार्केटमध्ये दाखल; प्रतिडझनाचा दर किती?

Mumbai BEST Bus: महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्टचा मोठा निर्णय, 'या' मार्गांवर विशेष बस चालणार!

Marathi Breaking News LIVE: छत्रपती संभाजीनगरच्या टीव्ही सेंटर परिसरात हिट अँड रन

Putin India Visit: आजचा भारत ७७ वर्षांपूर्वीचा नाही, मोदी-पुतिन भेटीत उघडकीस आले राजकारण अन् तेल करारांचे रहस्य; बाह्य दबाव फेल!

तेजश्री प्रधानचा गौरव! महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठीत सांस्कृतिक पुरस्कार जाहीर, म्हणाली...'प्रत्येक दिवस काहीतरी नवीन...'

SCROLL FOR NEXT