riteish deshmukh and genelia D'souza in marathi serial tujhech mi geet gaat ahe and sukh mhanje nakki kay asta on star pravah for ved movie promotion  sakal
मनोरंजन

Marathi Serials: मराठी मालिकांमध्ये दिसणार रितेश - जेनिलिया, या दिवशी..

स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' आणि 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकत येणार रितेश आणि जेनिलिया..

नीलेश अडसूळ
स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील मल्हार आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील जयदीप-गौरीच्या नात्यात बरीच उलथापालथ सुरु आहे. मल्हार आणि मोनिकाच्या नात्यात स्वराजमुळे कटुता निर्माण झालीय. तर तिकडे जयदीप-गौरीही एकमेकांपासून दुरावले आहेत.
दोन्ही मालिकांमध्ये जरी नात्यात दुरावा निर्माण झाला असला तरी प्रेम मात्र निरंतर आहे. याच प्रेमाची जाणीव करुन देण्यासाठी मालिकेत दोन खास पाहुणे येणार आहेत.
त्यासाठीच तुझेच मी गीत गात आहे आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या सेटवर रितेश आणि जिनिलिया देशमुख यांनी हजेरी लावली.
नातं प्रेमामुळे टिकतं. कितीही अडचणी आल्या तरीही प्रेमासाठी खंबीर रहायचं. आपण हरलो तर प्रेमही हरतं म्हणून हिंमतीने लढायचं हा अनोखा संदेश रितेश-जिनिलियाने स्वराज आणि मल्हारला दिलाय.
तुझेच मी गीत गात आहे प्रमाणेच सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतल्या गौरीसोबतही रितेशचा खास सीन पाहायला मिळणार आहे. गौरी सध्या जयदीप आणि लक्ष्मीच्या शोधात आहे. गौरीच्या या प्रवासात तिची रितेश देशमुखशी भेट होते. या प्रवासात नेमकं काय काय घडतं? खऱ्या प्रेमाचं महत्त्व रितेश गौरीला कश्या पद्धतीने पटवून देतो? हे मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळेल.
रितेश आणि जिनिलिया देशमुखचा वेड सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. निरपेक्ष प्रेम म्हणजे वेड असतं. याच निरपेक्ष प्रेमाचं महत्व पटवून देणाऱ्या वेड या सिनेमाची सध्या कमालीची उत्सुकता आहे. वेड सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने रितेश आणि जिनिलियाने स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिका तुझेच मी गीत गात आहे आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये हजेरी लावली.
रितेश-जिनिलियासोबतचा हा विशेष भाग पाहायला विसरु नका २३ डिसेंबरला तुझेच मी गीत गात आहे रात्री ९ वाजता आणि २६ डिसेंबरला सुख म्हणजे नक्की काय असतं रात्री ९.३० वाजता फक्स्र प्रवाहवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : दहा वर्षे प्रेमसंबंध, ब्रेकअपनंतर भेटायला बोलावून भररस्त्यात प्रेयसीची हत्या, स्वत:लाही संपवलं

Yellow Rain Kolhapur : काय सांगता! कोल्हापूरच्या कागल परिसरात चक्क पिवळा पाऊस, सोशल मीडियावर Video Viral

AUS vs IND, 3rd ODI: भारताच्या Playing-XI मध्ये कुलदीप यादवला संधी, पण नितीश रेड्डीच्या न खेळण्याचं खरं काय कारण? BCCI कडून खुलासा

Whatsapp Storage Feature : स्टोरेज सतत फूल होतंय? व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं जबरदस्त फीचर; एका क्लिकमध्ये मॅनेज करता येणार मोबाईलचा स्पेस

Healthy Life: फक्त सकाळी जिम अन् डाएट करणे पुरेसे नाही, तर हृदयरोगतज्ज्ञांच्या मते 'या' गोष्टींही ठेवल्या पाहिजे लक्षात

SCROLL FOR NEXT