riteish deshmukh and genelia D'souza Ved Movie Box Office Collection 50 crore crossed  sakal
मनोरंजन

Ved Movie Box Office Collection: अखेर 'वेड'नं केला 50 कोटीचा टप्पा पार! रितेशचा जेनेलियानं जिंकलं..

रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या 'वेड' चित्रपटाची विक्रमी कमाई..

नीलेश अडसूळ

Ved Movie Box Office Collection:   सध्या मनोरंजन विश्वात चर्चा सुरु आहे ती म्हणजे रितेश देशमुखच्या वेड या चित्रपटाची. मराठी मनोरंजन विश्वात या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या 'वेड' या सिनेमाने जवळपास सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. सलग तीन आठवडे या चित्रपटाने तूफान कमाई केली आहे. आता तर या चित्रपटाने 50 कोटी रुपये ही विक्रमी कमाई पार केली आहे. रितेश आणि जेनेलिया यांनी पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.

riteish deshmukh and genelia D'souza Ved Movie Box Office Collection 50 crore crossed

सैराटनंतर अशी विक्रमी कमाई केलेला 'वेड' हा दुसरा सिनेमा आहे. अजूनही हा चित्रपट जोरदार सुरू आहे. आता पुन्हा सिनेमा लव्हर्स डे आणि शनिवार - रविवार ही सुटयांचे दिवस आल्याने हा चित्रपट आणखी काही रेकॉर्ड माडेल असे दिसते आहे. आता 'वेड' ७५ कोटींपर्यंत कधी मजल मारतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

रितेशने ही आनंदाची बातमी देताना एक पोस्ट शेयर केली आहे. ''शब्द अपुरे पडत आहेत!!! वेड चित्रपटाला मोठ्या मनाने आपण स्वीकारले आणि भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार!'' असे त्याने पोस्ट मध्ये म्हंटले आहे.

सोमवारी एका दिवसात 'वेड'नं 1.04 कोटींची कमाई केली होती, तर 18 दिवसात 48.70 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने एका आठवड्यात 20 कोटी तर 13 दिवसात 40 कोटी कमावले. अखेर या चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा पार केल्याने सगळ्यांच्याच माना उंचावल्या आहेत.

रितेशचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. रितेश व जिनिलीयाच्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT