Ritesh Deshmukh, Genelia D'souza google
मनोरंजन

जेनेलियापेक्षा अधिक प्रेम रितेश देशमुखचं 'या' गोष्टीवर आहे

सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करीत दिली 'त्या' दुसऱ्या प्रेमाची कबुली

प्रणाली मोरे

बॉलीवूडमधलं(Bollywood) सगळ्यात आदर्श कपल म्हणजे रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसोझा(Genelia D'souza). सुखासुखी चाललेला संसार,छान दोन मुलांचे आई-बाबा झाल्यानंतरही फुलत जाताना दिसणारं दोघांमधलं प्रेम,घर आणि कामाचा उत्तम साधलेला ताळमेळ असं कुटुंबकर्तव्य निभावत आनंदानं जगणारं हे जोडपं. नेहमीच दोघे सोशल लाइफ एन्जॉय करताना दिसतात. त्यांचे अनेक व्हिडीओ मीडियावर चाहत्यांची वाहवा मिळवून जातात. खरंतर लग्नाआधी देखील हे दोघे अनेक वर्ष गोड प्रेमाच्या बंधनात होतेच. त्यामुळे दोघांच्या लग्नाला दहा वर्ष झाली असली तरी एकमेकांसोबत त्यांच्या असण्याला सोळा-सतरा वर्ष होऊन गेलीयत. पण तरीही आजदेखील यांच्याकडे पाहिलं की प्रेम करावं,नातं निभवावं ते या दोघांसारखं असं वाटून जातं. पण आपल्या रितेश दादानं आता एक व्हिडीओ पोस्ट करून संभ्रमात टाकलं ना राव.

रितेशनं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. खरंतर संपूर्ण व्हिडीओ पाहिलात तर त्याच्या आणि जेनिलयातील प्रेमाविषयी जो काही गैरसमज झालेला असेल तो दूर होईल खरा,पण व्हिडीओची सुरुवात पाहिल्यावर त्यांच्या चाहत्यांना थोडंस विचित्रही वाटेल . म्हणूनच रितेशनं त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडीओ इथे देत आहोत. तर त्या व्हिडीओ रीलमध्ये जेनेलिया-रितेश एकत्र एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत. पण त्याआधी फ्रेममध्ये एकटा दिसणारा रितेश कॅमेऱ्यासमोर म्हणतोय,''माझं स्वतःवर अधिक प्रेम आहे पण....''

आणि मग एक मोठा पॉझ येतो. अन् लगेचच जेनेलिया कॅमेऱ्यात दिसते ती थेट रितेशच्या मिठीत. आणि मग बॅकग्राऊंडला आवाज येतो,''पण मी सर्वात जास्त आनंदी असतो जेव्हा मी तुझ्यासोबत असतो''. आता तेच म्हटलं ना राव,जेनेलियाच्या इतकं प्रेमात असणाऱ्या रितेशला अचानक काय झालं की तो म्हणतोय,''माझं स्वतःवर अधिक प्रेम आहे''. असो आता आपल्या सगळ्यांचाच गैरसमज दूर झाला असेल तर आनंद घ्या रितेश-जेनेलियाच्या या नव्या व्हिडीओ रीलचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT