Riteish Deshmukh,Genelia D'souza
Riteish Deshmukh,Genelia D'souza Goole
मनोरंजन

Valentine Day: 'आज तर 'ब्लॅक डे';रितेश-जेनेलियाच्या व्हिडीओची चर्चा

प्रणाली मोरे

रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसोझा-देशमुख(Genelia Deshmukh) हे ब़ॉलीवूडमधलं खूप हॅप्पी कपल आहे. ते नेहमीच कुठल्याही कार्यक्रमातनं मग तो कुटुंबासोबतचा असेल किंवा बॉलीवूड संदर्भातला असू दे एकमेकांसोबत खूप खूश दिसतात. अर्थात आज त्यांच्या लग्नाला दहा वर्ष झाल्यानंतर तसंच दोन मुलांचे आई-बाबा झाल्यानंतरही त्यांच्यातलं बहरत जाणारं नातं पाहिलं की कधीकधी त्यांच्या नात्याचा हेवा वाटतो. आज तर व्हॅलेंटाईन दिवशी त्यांचं खास प्लॅनिंग असणार अशीच चर्चा सगळीकडे रंगली होती. पण तसं काही पहायला मिळालं नाही बुवा. उलट या दोघांनी व्हॅलेटाईन डे ला वेगळाच संदेश आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून दिल्याचं भासतंय.

त्याचं झालं असं की रितेश देशमुखनं नेहमीप्रमाणे किंवा म्हणूया चालीरितीप्रमाणे सोशल मीडियावर व्हॅलेंटाईन दिवसाच्या शुभेच्छा देताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. पण त्या व्हिडीओत रितेशच्या चेहऱ्यावर व्हॅलेंटाईन दिवसाला घेऊन वेगळ्याच भावना पहायला मिळत आहेत. त्यात जेनेलिया दिसत आहे पण आजच्या दिवशी तिचाही मूड ऑफ दिसतोय. नाहीतर एरव्ही आपली जेनेलिया वहिनी हसतखेळतच असते ना राव. मग झालं काय या दोन लव्हबर्ड्सना...त्यात रितेशने व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला जे गाणं लावलंय त्याचे शब्दही आहेत 'वो कितने मासूम थे,क्या से क्या हो गया देखते देखते...'आता काय म्हणायचं याला. चाललंय की सगळं ठीक.

त्याच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं लिहिलंय,'आज तुमचा ब्लॅक डे आहे का?' आता घ्या असे चेहरे घेऊन व्हिडीओ पोस्ट केल्यावर बिचाऱ्या प्रेमवीरांचा मोरल डाऊन होतो ना. आणि ते ही आजच्या व्हॅलेंटाईन दिनी. आता रितेशने मजेत केलाय तो व्हिडीओ शेअर पण चाहते घाबरले ना की खरंच या प्रेमी जोडप्यात काही बिनसलं की काय. तर नो वरीज वाचकहो,सगळं आलबेल आहे. हे आपलं रितेशनं आणि सोबत आम्हीपण थोडी मजा केली ना राव. हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : मी आतापर्यंत कोणालाही धमकी दिली नाही- अजित पवार

SCROLL FOR NEXT