Anant Amban And Radhika Merchant esakal
मनोरंजन

Riteish Deshmukh: "प्रिय अनंत, तुझे हृदय समुद्रासारखे विशाल आहे..."; रितेश देशमुखची खास पोस्ट, राधिकाबद्दल म्हणाला...

Anant Amban And Radhika Merchant: रितेशनं नुकतीच अनंत आणि राधिका यांच्यासाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. रितेशच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.

priyanka kulkarni

Anant Amban And Radhika Merchant: अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री-वेंडिंग फंक्शन्सला विविध कलाकारांनी हजेरी लावली. या दोघांच्या प्री-वेडिंग फंक्शनला अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांनी देखील हजेरी लावली. रितेशनं नुकतीच अनंत आणि राधिका यांच्यासाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. रितेशच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.

रितेशची पोस्ट

रितेशनं सोशल मीडियावर अनंत आणि राधिका यांचे फोटो शेअर केले आहेत. तसेच रितेशनं एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये जिनिलिया आणि रितेश हे अनंतसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. या पोस्टला रितेशनं कॅप्शन दिलं, "प्रेम आणि आनंदाच्या रंगांनी रंगवलेल्या एका जोडप्याला प्रेमाच्या नात्यात खोलवर गुंफलेले आम्ही पाहिले. फटाक्यांच्या प्रवाश सर्वत्र होता, त्यांच्या अंतःकरणातील प्रेम आणि जल्लोष दिसत होते. प्रिय राधिका,तुझे स्मित हास्य हे सर्वांना मोहित करते. तुझा प्रत्येक दिवस आनंदी आणि तुझ्या स्मितहास्यासारखा तेजस्वी असो."

"प्रिय अनंत, तुझे हृदय समुद्रासारखे विशाल आहे.तुझे वंताराचे स्वप्न केवळ प्रेरणादायी नाही तर वन्यजीवांबद्दलच्या तुझ्या अतुलनीय समर्पणाचा दाखला आहे. तू तुझ्या आई-वडील,भावंड आणि विशेषत:राधिकाबद्दल ज्या प्रकारे बोलला ते आमच्या हृदयाला भिडले. तुम्ही दोघांनी सुरू केलेल्या या सुंदर प्रवासाबद्दल तुमचे अभिनंदन! तुमचे दिवस चिरंतन आनंदाने भरलेले असावेत.", असंही रितेशनं कॅप्शन दिलं.

रितेशनं शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

प्री-वेडिंगला कलाकारांची हजेरी

दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, जान्हवी कपूर,सारा अली खान, शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला हजेरी लावली.अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये गायिका रिहाना आणि रॉकस्टार दिलजीत दोसांझ यांनी परफॉर्म केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT