riteish
riteish 
मनोरंजन

अशीही एक गळाभेट.. वडिल विलासरावांच्या स्पर्शाचा मार्मिक व्हिडिओ शेअर करुन रितेश देशमुखने केलं भावूक

सकाळवृत्तसेवा

मुंबई- अभिनेता रितेश देशमुखने सोशल मिडीयावर वडिल विलासराव देशमुखांच्या जयंतीनिमित्त एक मार्मिक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या पेहरावाच्या मदतीने त्याने वडिल विलासरावांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ पाहून सगळ्यांच्याच लक्षात येईल की रितेशला त्याच्या वडिलांची कमतरता जाणवत आहे आणि त्यांच्या स्पर्शासाठी तो आतुर झालेला आहे. 

वडिल विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिनेता रितेश देशमुखने भावूक करणारा एक व्हिडिओ सोशल साईटवर पोस्ट केलाय. हा व्हिडिओ त्याने टिकटॉकसोबतंच ट्वीटवरही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रितेश हँगरवर असणा-या एका कुर्ता-जॅकेट असलेल्या पेहरावाकडे जातो. आणि मग त्यात एक हात टाकून व्हिडिओ शूट करतो. हा व्हिडिओ पाहताना असं वाटतंय की विलासराव त्याच्या पाठीवर स्वतः हात फिरवत आहे आणि रितेशने त्यांना मिठी मारली आहे. अभी मुझमे कही बाकी थोडीसी है जिंदगी या गाण्यावर शूट केलेला हा व्हिडिओ पाहून अनेकांना भरुन आलं आहे. 

हा कुर्ता-जॅकेटचा पेहराव पाहून असं वाटतंय की तो विलासरावांच्या आवडत्या पेहरावापैकी एक असावा. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना ही अशी अनोख्या पद्धतीची आणि भावूक करणारी गळाभेट रितेशने दिली आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने हॅप्पी बर्थडे पापा, मी तुम्हाला दररोज मिस करतो. असं कॅप्शन दिलंय. आज विलासरावांची ७५ वी जयंती आहे. 

सोशल मिडियावर रितेशचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. रितेशने वडिलांना दिलेली ही अनोखी श्रद्धांजली सगळ्यांनाच आवडली आहे. केवळ चार तासात टिकटॉकवर हा व्हिडिओ १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे तर ट्वीटरवर ४७ हजार पेक्षा जास्त लोकांनी आत्तापर्यंत या व्हिडिओला लाईक केलं आहे.    

riteish deshmukh tiktok video going popular on internet remembers his father

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT