riteish team esakal
मनोरंजन

'तु गुंडासारखा दिसतोस' काकांची प्रतिक्रिया, रितेशचा 'कडक' व्हिडिओ

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) हा त्याच्या वेगळेपणासाठी प्रख्यात आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) हा त्याच्या वेगळेपणासाठी प्रख्यात आहे. तो आणि त्याची पत्नी जेनेलिया हे दोघेही वेगवेगळ्या प्रकारचे फनी व्हिडिओ शेयर करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी रितेशनं त्याच्या मुलांसमवेत एक व्हिडिओ शेयर केला होता. त्यात त्यानं एक कार भरधाव वेगानं येताना दाखवली होती. ती कार रस्त्यातील इतर कारलाही धड़का देत होती. यावर मुलं म्हणतात, बाबा, आई आली....हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (riteish deshmukh video viral uncle says you are like a gunda yst88)

आता रितेशचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्याला एका काकांनी गंमतीशीर कॉमेंट केली आहे. मात्र त्यामुळे नाराज न होता त्यानं त्या काकांशी शेक हँण्ड केलं आहे. सध्या हा व्हि़डिओ चाहत्यांच्या चर्चेचा विषय झाला आहे. त्यातून रितेश किती नम्र आणि आदरशील आहे हे त्यातून दिसते आहे. त्याच्या चाहत्यांनी देखील या स्वभावाचे कौतूक केले आहे. रितेश त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरसाठीही प्रसिद्ध आहे.

विरल भयानीनं हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यात आपण पाहू शकतो की, एक म्हातारे आजोबा रितेशला भेटतात. आणि ते त्याच्याशी हस्तांदोलन करतात. आणि त्याला म्हणतात तु तुझ्या चेहऱ्यावरचा मास्क काढ. त्यावेळी ते आजोबा म्हणतात, तु आता गुंडासारखा दिसतो आहे. यावर रितेशनं त्यांच्याशी एक दोनवेळा शेक हँड केला. त्यानंतर तो आपल्या गाडीत बसून निघून गेला.

रितेशच्या व्हिडिओवर त्याच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझर्सनं लिहिलं आहे की, मी रितेश आणि जेनेलियाला भेटलो आहे. हे दोघेही अतिशय गोड आहेत. एकानं लिहिलं आहे की, मला आता वाटलं की, आजोबा आता गाडीतच बसायचं म्हणतात की काय, रितेशच्या चाहत्यांनी देखील हा व्हिडिओ इंजॉय केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Kolhapur News : पोलिसांचे साखर कारखानदारांना सहकार्य?, कोल्हापुरात उसाने भरलेली वाहने पेटवली; Video Viral

पडद्यावर बोलक्या नजरा, आयुष्यात विचारशील मन – स्मिता पाटीलच्या आठवणींना उजाळा

Latest Marathi News Update : १५ लाख कोटी रुपये पडून, पण कुशल कामगारच नाहीत : गडकरी

Success Story: पोलिओनं पाय रोखले, पण स्वप्नांना दिली उड्डाणं! सिन्नरच्या जिद्दी मधुमिता पुजारीची डॉक्टर होण्याकडे वाटचाल

Global Award : डॉ. बाबासाहेब सोनवणे यांच्या संशोधन कार्याचा सन्मान; सौदी अरेबियातील परिषदेत पुरस्काराने गौरव

SCROLL FOR NEXT